AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | चिमुकल्यांचा हट्ट पुरवत ‘दत्तामामा’, मंत्री भरणेंकडून दोन हजारांची खेळणी भेट

लग्न मंडपाबाहेर उपस्थित असणाऱ्या सर्व बालगोपाळांना दोन हजार रुपयांची खेळणी विकत घेऊन दिली. (Dattatray Bharne toys to kids )

VIDEO | चिमुकल्यांचा हट्ट पुरवत 'दत्तामामा', मंत्री भरणेंकडून दोन हजारांची खेळणी भेट
दत्ता भरणे यांच्याकडून चिमुकल्यांना खेळणी भेट
| Updated on: Mar 08, 2021 | 8:09 AM
Share

इंदापूर : राज्यमंत्री दत्ता भरणे (Dattatray Bharne) यांना कामचुकार अधिकाऱ्यांना खडसावताना आपण पाहिलं आहे. ‘दत्तामामा’ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे चिमुकल्यांचा हट्ट पुरवताना दिसत आहेत. चिमुकल्यांनी खेळणी मागताच खेळणी विक्रेतीकडून त्यांनी चक्क दोन हजारांची खेळणी विकत घेतली. लहानग्यांचे लाड करणाऱ्या दत्तामामांचा व्हिडीओ समोर आला आहे. (Minister Dattatray Bharne buys toys to kids worth two thousand)

बालगोपाळांचा दत्तामामांकडे हट्ट

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सहकुटुंब सहपरिवार एका लग्नाला गेले होते. लग्न होऊन परत येताना लग्नमंडपाच्या शेजारी एका चिमुकलीने राज्यमंत्र्यांकडे खेळणे घेण्याचा हट्ट धरला. यावेळी तात्काळ राज्यमंत्र्यांनी तिथल्या खेळणी विक्रेतीकडून खेळणी विकत घेतली, फक्त तीच चिमुकली नाही, तर तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व बालगोपाळांना दोन हजार रुपयांची खेळणी विकत घेऊन दिली.

पाहा व्हिडीओ :

हातात खराटा घेत स्वच्छता

“आता ठरवायचय जुनं वालचंदनगर पुन्हा बनवायचं” ही स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेतंर्गत माजी उपसरपंच सध्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहिम राबवण्यास सुरुवात केली. या मोहिमेचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला होता. यावेळी त्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता करत मोहिमेचा शुभारंभ केला होता. (Minister Dattatray Bharne buys toys to kids worth two thousand)

आपल्या आलिशान गाडीने वृद्ध महिलेला तिच्या घरापर्यंत सोडवण्याची घटना असो, किंवा अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी स्वतःच्या गाडीत नेल्याची घटना असो, अशा अनेक घटना इंदापूरसह महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. आजही त्यांनी स्वतः हातात खराटा घेत केलेल्या या स्वच्छतेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. इंदापूरसह महाराष्ट्रात सर्वसामान्यांचे मामा म्हणून ओळख असणाऱ्या राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी चिमुकल्यांची अशाप्रकारे मनं जिंकली. याचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या :

पांढरे कपडे, हातात झाडू, राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंकडून स्वच्छता मोहिमेचा आदर्श

..आणि नेहमी शांत असणारे दत्तामामा भडकले! कारण काय?

(Minister Dattatray Bharne buys toys to kids worth two thousand)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.