VIDEO : पांढरे कपडे, हातात झाडू, राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंकडून स्वच्छता मोहिमेचा आदर्श

स्वच्छता मोहिमेचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला.(Minister Dattatray Bharne Clean Indapur Walchandnagar)

VIDEO : पांढरे कपडे, हातात झाडू, राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंकडून स्वच्छता मोहिमेचा आदर्श
दत्तात्रय भरणेंची स्वच्छता मोहिम

पुणे (इंदापूर) : “आता ठरवायचय जुनं वालचंदनगर पुन्हा बनवायचं” ही स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेतंर्गत माजी उपसरपंच सध्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहिम राबवण्यास सुरुवात केली. या मोहिमेचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता करत मोहिमेचा शुभारंभ केला. (Minister Dattatray Bharne Clean Indapur Walchandnagar)

विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांच्या संकल्पनेतून या उपक्रमास भरणे यांनी सुरवात केली. वालचंदनगर परिसराची गेल्या 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक वेगळी ओळख होती. सुसज्ज, टापटीप आणि गर्द हिरवळीने नटलेले वालचंदनगर अशी या गावाची ओळख होती. तसा मोठा नावलौकिक होता. मात्र औद्योगिक मंदीमध्ये येथील अनेक नागरिक स्थलांतरित झाले. हळूहळू येथील मुलभूत सुविधाही कमी होऊ लागल्या होत्या. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत गेलं.

Dattatray Bharne

दत्तात्रय भरणेंची स्वच्छता मोहिम

हे गेलेले वैभव पुन्हा मिळवण्यासाठी गायकवाड यांनी ही मोहीम हातात घेतली. स्वतः पुढाकार घेऊन सध्या स्व:खर्चातून परिसरातील स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे भरणे यांनी स्वतः हातात खराटा घेत स्वच्छता केली. आजूबाजूच्या परिसरातील कचराही त्यांनी उचलला. या स्वच्छता मोहिमेस सुरुवात करुन ते पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.

Dattatray Bharne

दत्तात्रय भरणेंची स्वच्छता मोहिम

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मागील वर्षी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या अनोख्या कार्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. सर्व सामान्यबद्दलची असलेली त्यांची नाळ ही कायमस्वरूपी अजूनही टिकून असल्याचे दिसून येत आहे.

Dattatray Bharne

दत्तात्रय भरणेंची स्वच्छता मोहिम

यात आपल्या आलिशान गाडीत एका वृद्ध महिलेला तिच्या घरापर्यंत सोडवण्याची घटना असो, किंवा अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी स्वतःच्या गाडीत नेल्याची घटना असो,अशा अनेक घटनाे इंदापूरसह महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. आजही त्यांनी स्वतः हातात खराटा घेत केलेल्या या स्वच्छतेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.  (Minister Dattatray Bharne Clean Indapur Walchandnagar)

संबंधित बातम्या : 

‘तुम कुस्ती करो, हम कपडे संभालते हैं!’ असलं काही करु नका, अजितदादांचा मोलाचा सल्ला

..आणि नेहमी शांत असणारे दत्तामामा भडकले! कारण काय?

Published On - 5:33 pm, Sun, 7 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI