लसीकरणाचा उत्सव जरूर करू, पण आधी लस तर द्या; जयंत पाटलांचा खोचक टोला

| Updated on: Apr 09, 2021 | 2:03 PM

मात्र केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश दिसत आहे, असे जयंत पाटील म्हणाले. (Minister Jayant Patil On Corona Vaccine)

लसीकरणाचा उत्सव जरूर करू, पण आधी लस तर द्या; जयंत पाटलांचा खोचक टोला
जयंत पाटील
Follow us on

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र ही लसीअभावी बंद करावी लागली आहेत. तर काही ठिकाणी कोरोना लस तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील लस देणं बंद करण्यात आलं आहे. राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढ्याच लसी आहेत. त्यावरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. लस वाटप नियंत्रण केंद्राच्या हातात आहे. मात्र केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश दिसत आहे, असे जयंत पाटील म्हणाले. (Minister Jayant Patil On Corona Vaccine)

..तर लस उत्सवाची वेळ बदला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देशात चार दिवस लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पण लस उत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची गरज आहे. आम्ही टीका उत्सव करु. पण आधी लस द्या. जर ही लस नसेल तर लस उत्सवाची वेळ बदला, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला, तिथे जास्त लस दिली पाहिजे. महाराष्ट्राची मागणी 40 ते 50 लाख इतकी होती. मात्र केंद्राकडून फक्त साडे सतरा लाख लस मिळाल्या. या लसी लवकर संपतील. आजही बीकेसीच्या कोरोना लसीकरण केंद्रात लस नाही. तिथे लोकं लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. पण लस उपलब्ध नसेल तर कसं होणार, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश

लस वाटप नियंत्रण हे केंद्राच्या हातात आहे. केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश दिसत आहे. पंतप्रधान मोदी जे सांगितली ते देश करायला तयार आहे. त्यांनी थाळी वाजवायला सांगितली, आम्ही ते केलं. त्यावर टीका केली नाही. पण आता देशात कोरोना लसीचा फक्त पुरवठा झाला पाहिजे. आता आम्ही टीका उत्सवही करु. पण त्यासाठी लस द्या. ती नसेल तर लस उत्सव वेळ बदला, असेही ते म्हणाले.

‘लसीकरण उत्सव साजरा करु’

कोरोनाची लस घेतल्यानंतरही कुठल्याही प्रकारचा बेजाबदारपणा होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आपल्याला लोकांना हे वारंवार सांगावं लागेल की लस घेतल्यानंतरही मास्क आणि सावधगिरी बाळगा. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आपण लसीकरण उत्सव साजरा करु, असं आवाहनही मोदींनी केलं आहे.

लसीचा तुटवडा, राजकारणाला ऊत

राज्यात 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे कोरोना लस आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन आता राज्यात जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. (Minister Jayant Patil On Corona Vaccine)

संबंधित बातम्या : 

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त ताकदवान : पंतप्रधान मोदी

गुजरातची लोकसंख्या आपल्यापेक्षा निम्मी, तरी त्यांना जास्त लसींचा साठा, संयमी राजेश टोपे कडाडले