AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझी DNA करा, नशा करत असेन तर सन्यास.. EDच्या रडारवर फक्त मराठी माणूस, यात 3 व्यक्तींचा हात, नितीन देशमुखांचे खळबळजनक आरोप

शिवसेना फोडण्याचं भाजपचं षडयंत्र दोन वर्षांपासून सुरू होतं. मदतीच्या नावाखाली आमदाराचे शोषण करायचे, असा खुलासा नितीन देशमुख यांनी केलाय.

माझी DNA करा, नशा करत असेन तर सन्यास.. EDच्या रडारवर फक्त मराठी माणूस, यात 3 व्यक्तींचा हात, नितीन देशमुखांचे खळबळजनक आरोप
Image Credit source: social media
| Updated on: Jan 12, 2023 | 2:49 PM
Share

स्वप्निल उमप, अमरावतीः शिवसेनेत बंडखोरी करून सूरतेच्या वाटेवर निघालेल्या आमदारांच्या (Shivsena MLA) ताफ्यातून, गुजरातच्या सीमेवरूनच परत फिरलेल्या आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी आज भाजपवर (BJP) सनसनाटी आरोप केलेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख म्हणाले, मी तेव्हा नागपुरात कसा पोहोचला मला माहिती आहे. पण मला सूरतला हृदयविकाराचा झटका आला, असं कुणी सांगितलं तर कुणी माझा घातपात झाल्याचं म्हटलं… हृदयविकाराचा झटका आला असेल तर मी तीन दिवसात नागपुरात कसा पोहोचेन? असा सवाल नितीन देशमुख यांनी केला.

आमदार नितीन देशमुख हे अमरावतीत शिक्षक पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ सभेत आमदार नितीन देशमुख बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.

सूरतेतून परत फिरल्याच्या त्या प्रसंगाबद्दल सांगताना आमदार नितीन देशमुख म्हणाले, ‘ गुजरातमध्ये काही पेपरने तेव्हा बातम्या छापल्या होत्या की, नितीन देशमुख नशेत धुंद होते… मी म्हणतो माझा dna करा.. मी जर नशा करत असेन तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं चॅलेंज नितीन देशमुख यांनी दिलंय.

भाजपच्या तीन व्यक्तींवर नितीन देशमुख यांनी मोठे आरोप केले. ते म्हणाले, ‘ सध्या फक्त मराठी माणूस केंद्रीय तपास यंत्रणा तसेच ईडीच्या रडावर आहेत. हे कारस्थान किरीट सोमय्या, मोहित कंबोज ,आणि रवी राणा करत आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं बदला घेतला पण आता या मतदारसंघात आपल्याला बदल घ्यावा लागेल.. 2014 मध्ये आमचे 63 आमदार होते.. 2019 मध्ये मोदी यांचा फोटो शिवसेनेने लावला. आणि आमचं मताधिक्य कमी झालं…आपल्याकडे सैन्य अफाट आहे पण आपल्याला ही निवडणूक युक्तीने लढवली पाहिजे, असं वक्तव्य नितीन देशमुख यांनी केलं.

शिवसेना फोडण्याचं भाजपचं षडयंत्र दोन वर्षांपासून सुरू होतं. मदतीच्या नावाखाली आमदाराचे शोषण करायचे; मदत करून शोषण करण्यात आले.. हे षड्यंत्र भारतीय जनता पार्टीच्या बिरबलाने केलं, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...