राजकारणात तडजोड करूनच युती करावी लागते, प्रकाश आंबेडकरांना शिंदे गटाच्या आमदाराचा सल्ला?

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यादरम्यान युतीच्या चर्चा सुरु असतानाच आज अचानक आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची माहिती समोर आली.

राजकारणात तडजोड करूनच युती करावी लागते, प्रकाश आंबेडकरांना शिंदे गटाच्या आमदाराचा सल्ला?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 2:18 PM

मुंबईः वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिंदे गटाची युती होणार की नाही, यावर स्वतः प्रकाश आंबेडकर यांनीच पडदा पाडला. मला शिवसेनेचं (Shivsena) वावडं नाही, पण शिंदे गट भाजपासोबत असल्याने एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) युतीचा प्रश्न येत नाही, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय. मात्र यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट प्रकाश आंबेडकरांनाच सल्ला दिलाय. राजकारणात कुठेतरी तडजोड करावी लागते. तडजोडीनंतरच युती होत असते, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.

बाळासाहेबांची शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकर यांना युती करायची आहे. मात्र कोणाबरोबर करायची हे त्यांनी ठरवले पाहिजे.. उध्दव ठाकरे यांच्या बरोबर युती करण्यासाठी राष्ट्रवादी नको.. आमच्या बरोबर युती करण्यासाठी भाजप नको असे त्याचे मत आहे. त्यामुळे त्यांनी लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यादरम्यान युतीच्या चर्चा सुरु असतानाच आज अचानक आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची माहिती समोर आली. या भेटीनंतर शिंदे-आंबेडकर युतीच्या चर्चा सुरु झाल्या.

ही युती झाली तर उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा बसेल, अशी शक्यता वर्तवल्या जाऊ लागली. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच यासंबंधीचं स्पष्टीकरण दिलं.

उद्धव ठाकरे आणि आमच्यात चार भिंतीत एक कमिटमेंट झाली आहे. यात जागा वाटपावरही चर्चा झाली आहे. आमच्यात युती ठरली आहे, फक्त ती पब्लिकली जाहीर कधी करायची हे उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Non Stop LIVE Update
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.