AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंचा उदय सामंतांना फोन, शक्य तितक्या लवकर ग्रंथालये सुरू करु, सामंतांकडून आश्वासन

उदय सामंत यांनी याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अस आश्वासन राज ठाकरेंना दिलं.  (Raj Thackeray Call Uday Samant Regarding Library Reopen)

राज ठाकरेंचा उदय सामंतांना फोन, शक्य तितक्या लवकर ग्रंथालये सुरू करु, सामंतांकडून आश्वासन
| Updated on: Oct 08, 2020 | 1:53 PM
Share

मुंबई : राज्यातील ग्रंथालय प्रतिनिधींनी आज (8 ऑक्टोबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रंथालय पुन्हा सुरु करा, अशी मागणी राज यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी तात्काळ उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन करत ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर उदय सामंत यांनी याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अस आश्वासन राज यांना दिलं. (Raj Thackeray Call Uday Samant Regarding Library Reopen)

राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी तात्काळ उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन केला. त्यांच्यासमोर ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या. तसेच राज्यातील ग्रंथालयं सुरु करण्यास परवानगी देण्याची विनंती केली.

त्यानतंर उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या विनंतीला मान देत, शक्य तितक्या लवकर ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन त्यांना दिलं.

पुस्तकं ही सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात त्याची फार आवश्यकता आहे. म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये बंद केलेली ग्रंथालये पुन्हा सुरु करण्यात यावीत. त्यामुळे वाचन चळवळ वृद्धिंगत होईल. त्यावर अवलंबून असलेल्या अर्थचक्रालाही गती मिळेल, असे मत ग्रथांलय प्रतिनिधींनी राज ठाकरेंसमोर मांडलं होतं.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनलॉक सुरु आहे. त्यानंतर डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या सर्वांनी राज ठाकरेंकडे विविध मागण्यांचं साकडं घातलं होतं. यानंतर काही समस्यांवर तोडगाही निघाला होता. त्यामुळे अनेकांना विश्वास वाटत आहे.(Raj Thackeray Call Uday Samant Regarding Library Reopen)

संबंधित बातम्या : 

राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, ग्रंथालय प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीला

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीला चाप लावा, राज ठाकरेंची पत्राद्वारे मागणी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...