AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात लढणार

कल्याण-डोंबिवली महापालिकेत आमची ताकद आहे. आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही येणारी महापालिका निवडणूक लढणार आहोत, अशी घोषणा जाधव यांनी केलीय.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात लढणार
| Updated on: Feb 09, 2021 | 8:03 PM
Share

कल्याण : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोठी घोषणा केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत आमची ताकद आहे. आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही येणारी महापालिका निवडणूक लढणार आहोत, अशी घोषणा जाधव यांनी केलीय. तर आमचे जे नगरसेवक सोडून गेले त्यांमुळे आम्हाला काही फरक पडणार नाही, असंही अविनाश जाधव यांनी म्हटलंय.(MNS will contest KDMC elections under the leadership of MLA Raju Patil)

नगरसेवकांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर स्वत: राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांना कल्याण डोंबिवली प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यानंतर महापालिकेत पुन्हा एकदा जोमाने पक्षबांधणीचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.

मनसेला धक्का, पण कामाला लागा

मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील गटनेते मंदार हळबे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरेंनी वैयक्तिक चर्चा केली. मनसेची गळती रोखण्यासाठी नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंनी घरत यांच्यावर जबाबदारी सोपवली. आता नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या राज ठाकरेंच्या तिघा विश्वासू नेत्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी, गळती रोखणे आणि अधिकाधिक उमेदवारांना विजयी करणे ही जबाबदारी आहे.

आमचा एक आहे पण ‘नेक’ आहे

“राजू पाटील हे आपले एकमेव आमदार आहेत. लोक अनेकदा म्हणतात की एकच आहे… एकच आहे… आमचा एक आहे पण ‘नेक’ आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील सर्वांना एकच विनंती कि अशा पक्षांतराने अजिबात विचलित होण्याचे कारण नाही. राजू पाटील यांच्या नेतृत्वात आपण कल्याण डोंबिवलीत मोठे यश मिळविणार हे नक्की…”, असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये

ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?

MNS will contest KDMC elecvtions under the leadership of MLA Raju Patil

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.