मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. (KDMC MNS Mandar Halbe )

मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 2:00 PM

कल्याण डोंबिवली : मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम (Rajesh Kadam) यांच्या शिवसेना प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे (Mandar Halbe) यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला खिंडार पडले आहे. (KDMC MNS Corporator Mandar Halbe joins BJP)

मनसेचे माजी विरोधीपक्ष नेते मंदार हळबे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते आहेत. त्यांनी केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं आहे. दहा वर्षांपासून ते नगरसेवक आहेत.

‘कृष्णकुंज’वर येण्याचा निरोप टाळून हळबे भाजपात

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप मंदार हळबे यांच्या संपर्क साधत असल्याचं बोललं जातं. त्यामुळे मंदार हळबेंना तातडीने ‘कृष्णकुंज’वर पाचारण करण्यात आलं होतं. परंतु हळबेंनी भाजप प्रवेश केल्याचं वृत्त धडकलं.

कोण आहेत मंदार हळबे?

मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते

केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं

मंदार हळबे दहा वर्षांपासून कल्याणचे नगरसेवक

एकमेव आमदाराची कृष्णकुंजवर धाव

राजेश कदम आणि मंदार हळबे यांच्या पक्षांतरानंतर मनसे नेत्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण पसरल्याचं दिसत आहे. कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागल्यानंतर पक्षाच्या एकमेव आमदाराने कृष्णकुंजवर धाव घेतली. राजू पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. (KDMC MNS Corporator Mandar Halbe joins BJP)

पक्षाबद्दल कुठलीही नाराजी नाही

लहानपणापासून भाजपसाठी काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रेरित झालो. देवेंद्र फडणवीस यांचे कामही प्रभावी आहे. राम मंदिर उभारणीच्या कामापासून आपण काहीसे दूर राहत असल्याची भावना होती. सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी भाजपप्रवेश करत असल्याचं मंदार हळबे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ शी बोलताना सांगितलं. दहा वर्ष ज्या पक्षाने नेतृत्वाची संधी दिली, त्या पक्षाबद्दल कुठलीही नाराजी नाही, असं हळबेंनी स्पष्ट केलं.

राजेश कदम शिवसेनेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम (MNS Rajesh Kadam joins Shiv Sena) यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम हे ना आमदार आहेत, ना नगरसेवक, तरीही  थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश झाल्याने, राजेश कदम यांची कल्याण डोंबिवलीत किती ताकद असू शकते, याचा अंदाज बांधता येईल. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.

संबंधित बातम्या :

ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?

कल्याण डोंबिवली निवडणुकीपूर्वी मनसेला खिंडार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बडे नेते शिवसेनेत

(KDMC MNS Corporator Mandar Halbe joins BJP)

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.