कल्याण डोंबिवली निवडणुकीपूर्वी मनसेला खिंडार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बडे नेते शिवसेनेत

एकीकडे अर्थसंकल्पाची धामधूम सुरु असताना, इकडे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेना प्रवेशाची रेलचल पाहायला मिळाली.

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 18:11 PM, 1 Feb 2021
कल्याण डोंबिवली निवडणुकीपूर्वी मनसेला खिंडार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बडे नेते शिवसेनेत
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे

ठाणे : एकीकडे अर्थसंकल्पाची धामधूम सुरु असताना, इकडे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेना प्रवेशाची रेलचल पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या डोंबिवलीतील बड्या कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधलं. शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेचे कल्याण तालुक्यातील माजी अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अर्जुन पाटील यांच्यासह डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी सेना पदाधिकारी सागर जेधे यांनीही प्रवेश केला (Many MNS leader joins Shivsena in Thane).

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

जे शिवसेनेत आले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत. शिवसेनेची ताकद कल्याण डोंबिवलीत आहेच ती आता अधिक वाढते आहे. महाराष्ट्रातही ही ताकद वाढत आहे. शिवसेनेच्या भगव्या खाली एकत्र येत आहेत. या सर्वांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वाव या सर्व तरुणांना दिला जाईल.

हा देशाचा अर्थसंकल्प आहे, निवडणुकीचा नाही. बजेटवर मी पूर्ण बोलेन, अधिक माहिती घेऊन मत मांडेन असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :

महाविकास आघाडी चषकात मिलिंद नार्वेकरांची तुफान फटकेबाजी

मुख्यमंत्र्यांचं हसत स्वागत आणि शरद पवारांकडे बोट, विनायक मेटेंच्या देहबोलीची जोरदार चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विंटेज कारमध्ये बसून घेतला विंटेज कार रॅलीचा आनंद

व्हिडीओ पाहा :

Many MNS leader joins Shivsena in Thane