AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी अजिंक्य नाहीत, 2004 ला काय झालं होतं ते विसरु नका : सोनिया गांधी

रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज (nomination from) दाखल केला.  अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2004 च्या लोकसभा निवडणुकीची आठवण करुन दिली. शिवाय मोदी हे अजिंक्य नाहीत, असंही त्या म्हणाल्या. अर्ज भरल्यानंतर […]

मोदी अजिंक्य नाहीत, 2004 ला काय झालं होतं ते विसरु नका : सोनिया गांधी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज (nomination from) दाखल केला.  अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2004 च्या लोकसभा निवडणुकीची आठवण करुन दिली. शिवाय मोदी हे अजिंक्य नाहीत, असंही त्या म्हणाल्या.

अर्ज भरल्यानंतर सोनिया गांधींनी मोदींबद्दल प्रश्न विचारण्यात आल्या. त्यावर त्या म्हणाल्या, “मोदी हे बिलकुल अजिंक्य नाहीत, त्यांनी 2004 ची निवडणूक विसरु नये, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पुन्हा येईल, असं सर्वांना वाटत होतं. पण निकालानंतर काँग्रेसचं सरकार आलं.”

उत्तर प्रदेशात अमेठी आणि रायबरेली हे दोन काँग्रेसचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सोनिया गांधींनीही गुरुवारी अर्ज दाखल केला. 72 वर्षीय सोनिया गांधी या सलग पाचव्यांदा रायबरेलीतून निवडणूक लढत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर यापूर्वी काँग्रेसमध्येच असलेले दिनेश प्रताप सिंह यांचं आव्हान आहे. दिनेश प्रताप सिंह यांनी गेल्या वर्षी भाजपात प्रवेश केला होता.

अमेठी आणि रायबरेलीतून सपा आणि बसपाने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे इथे प्रमुख लढत काँग्रेस आणि भाजप अशीच होईल. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात म्हणजे 6 मे रोजी रायबरेलीसाठी मतदान होईल. सोनिया गांधींनी रायबरेलीतून 2004, 2006 (पोटनिवडणूक), 2009 आणि 2014 मध्येही निवडणूक जिंकली आहे.

संबंधित बातमी : सोनिया गांधींकडे रिलायन्सचे शेअर्स, इटलीत साडे सात कोटींचं घर

Follow Us
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट