AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण, कुटुंबातील आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली (MP Kapil Patil Tested Corona Positive) आहे.

भाजपचे खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण, कुटुंबातील आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
| Updated on: Jul 10, 2020 | 4:47 PM
Share

भिवंडी : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला (MP Kapil Patil Tested Corona Positive) आहे. भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कपिल पाटील यांना सौम्य लक्षणं असल्याने त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, सून, पुतण्या यांसह एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. खासदार कपिल पाटील यांना सौम्य लक्षण असल्याने घरातच क्वारंटाईन करण्यात आली आहे.

यापूर्वी पुण्यातील महापौर, उपमहापौर यांच्यासह भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र कालच त्यांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह झाला आहे.

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. (MP Kapil Patil Tested Corona Positive)

हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पुण्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांची पत्नी, हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन, नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन, बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर माजी महापौर आणि विद्यमान भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या मातोश्री यांनाही कोरोना झाला आहे.

याशिवाय नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. (MP Kapil Patil Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

BJP MLA Abhimanyu Pawar Corona | भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण, मुलालाही संसर्ग

BJP MLA Rahul Kool Corona | दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

Follow Us
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!