AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe Clarification | स्मार्ट सिटीच्या कामात कोणतीही अनियमितता नाही, गडकरींच्या तक्रारीनंतर तुकाराम मुंढेंकडून खुलासा

स्मार्ट सिटी CEO म्हणून कामात कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही, असा खुलासा मुढेंनी केला (Nagpur Commissioner Tukaram Mundhe clarification) आहे.

Tukaram Mundhe Clarification | स्मार्ट सिटीच्या कामात कोणतीही अनियमितता नाही, गडकरींच्या तक्रारीनंतर तुकाराम मुंढेंकडून खुलासा
| Updated on: Jul 01, 2020 | 6:39 PM
Share

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. स्मार्ट सिटी घोटाळा प्रकरणात पत्र लिहून गडकरींनी तुकाराम मुंढे यांची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तुकाराम मुंढेंनी खुलासा दिला आहे. स्मार्ट सिटी CEO म्हणून कामात कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही, असा खुलासा मुढेंनी केला आहे. (Nagpur Commissioner Tukaram Mundhe clarification On Nitin Gadkari complaints to Central Government)

नागपूर स्मार्टसिटीचे चेअरमन प्रवीणसिंह परदेशी यांनी मला CEO स्मार्ट सिटी नागपूरचा कार्यभार सांभाळण्यासाठी मोबाईलवर निर्देश दिले. स्मार्टसिटी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळतांना मी दैनंदिन कामकाज पार पाडत आहे. तसेच याबाबतचे टेंडर प्रक्रिया रद्द करताना चेअरमन यांच्याशी चर्चा केली, असे तुकाराम मुंढे म्हणाले.

तुकाराम मुंढेंचा खुलासा 

“मी मनपा आयुक्त म्हणून 28 जानेवारी 2020 रोजी रुजू झालो. मनपा आयुक्त हे स्मार्ट सिटी (SPV) चे पदसिध्द संचालक आहेत. रामनाथ सोनावणे हे स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होते. त्यांनी दिनांक 11 फेब्रुवारी 2020 रोजी या पदाचा राजीनामा श्री प्रविणसिंह परदेशी चेअरमन यांच्याकडे सुपूर्द केला.

नागपूर स्मार्टसिटीचे चेअरमन यांनी मला मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूरचा कार्यभार सांभाळण्यासाठी मोबाईलवर निर्देश दिलेत. त्यानुसार आणि शासन निर्णयानुसार आजपर्यंत मी सदर पदाचा कार्यभार सांभाळत आहे. स्मार्टसिटी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळतांना मी दैनंदिन कामकाज पार पाडीत आहे. सदर कालावधीत Transfer Station चे टेंडर रद्द करुन Bio Mining चे टेंडर जाहीर केले होते. सदर टेंडर रद्द करताना आणि Bio Mining चे टेंडर जाहीर करतांना चेअरमन यांचेशी चर्चा करूनच केलेले आहे. सदर जाहीर केलेले Bio Mining चे टेंडर अजूनही अंतिम झालेले नाही. सदर दोन्ही बाबी संचालक मंडळाच्या प्रस्तावित बैठकीत ठेवण्यात येत आहे. (Nagpur Commissioner Tukaram Mundhe clarification On Nitin Gadkari complaints to Central Government)

त्याचबरोबर कंपनीतील कर्मचाऱ्यांचे Annual Performance Appraisal नुसार आढावा घेऊन काही कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. वरील सर्व बाबी संचालक मंडळाच्या प्रस्तावित बैठकीत ठेवण्यात येत आहे.

या काळात कार्यालयीन खर्च आणि वेतनाच्या देयकाशिवाय केवळ एकच Running Bill देण्यात आले आहे. सदर बिल (Bill) यापूर्वीच मंजूर केलेल्या कामाचे व करार झालेल्या कंत्राटदराचे, त्यांनी केलेल्या कामाचेच आहे. यामध्ये कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही.

याविषयी CEO म्हणून काम करीत असताना कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही. संचालक मंडळाची बैठक कोरोनाच्या परिस्थितीमुळे होऊ शकलेली नाही. सदर बैठक प्रस्तावित आहे,” असा खुलासा नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

नितीन गडकरींच्या पत्रात नेमकं काय?

‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’चे सीईओ तुकाराम मुंढे यांचे वर्तन अवैध, असंवैधानिक, आणि घोटाळेबाज असल्याचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना लिहिले आहे.

तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिका आयुक्त म्हणून धुरा खांद्यावर येताच ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या सीईओपदाची जबाबदारी अवैधरीत्या बळकावल्याचा आरोप गडकरींनी केला आहे.

निविदा रद्द करणे, कोरोनासारख्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना टर्मिनेट करणे असे निर्णय मुंढे यांनी घेतल्याचा दावाही गडकरींनी पत्रात केला आहे. (Nagpur Commissioner Tukaram Mundhe clarification On Nitin Gadkari complaints to Central Government)

संबंधित बातम्या : 

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांची केंद्र सरकारकडे तक्रार, नितीन गडकरींचे पत्र

तुकाराम मुंढेंवर 20 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, महापौरांकडून पोलिसात तक्रार दाखल

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप