AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्खं सरकार उभं’, मलिकांच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना मलिकांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. याबाबत फडणवीस यांना विचारलं असता, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्खं सरकार उभं राहत असल्याचा संदेश देशभरात जाईल, अशी टीका फडणवीस यांनी केलाय.

'दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्खं सरकार उभं', मलिकांच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
नवाब मलिक, देवेंद्र फडणवीस
| Edited By: sagar joshi | Updated on: Feb 23, 2022 | 10:03 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय. कारण, दाऊत इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात 8 दिवसांची अर्थात 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना मलिकांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. याबाबत फडणवीस यांना विचारलं असता, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्खं सरकार उभं राहत असल्याचा संदेश देशभरात जाईल, अशी टीका फडणवीस यांनी केलाय.

अतिशय चुकीचा पायंडा पाडला जात आहे. त्यांना कुठल्याही राजकीय गुन्ह्यात अटक झालेली नाही. तर टेरर फंडिंग संबंधित गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने एफआयआर केलाय, ईडीने मनी लॉन्ड्रिंगमध्ये अटक केलीय. अशा परिस्थितीत एक मंत्री राजीनामा देणार नसतील आणि सरकार म्हणत असेल की आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही, तर एक संविधानिक परिस्थिती या ठिकाणी तयार होते. पण मी त्यावर बोलणार नाही. मी एवढंच सांगेन की देशात याचा चुकीचा संदेश जाईल. दाऊदसोबत व्यवहार करणाऱ्याच्या पाठीशी सरकार उभं राहत असल्याचा संदेश यातून जाईल, अशी टीका फडणवीस यांनी केलीय.

चंद्रकांतदादांकडून राजीनाम्याची मागणी

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशाराच चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत. मलिक यांची देहबोली म्हणजे गिरा तो भी टांग उपर आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागला. एक तर आहेत. एका नेत्याचा अनधिकृत बंगला पाडण्यात आला. एका नेत्याचं अनधिकृत रिसॉर्ट आहे. एका मंत्र्याला दोन पत्नी आहे. किती मोठी यादी आहे. हे काय चाललं आहे? सगळं कोलमडलं आहे, अशी टीका पाटील यांनी केलीय.

‘राजीनाम्याचा आसूरी आनंद भाजपला होऊ देणार नाही’

दरम्यान, मलिकांच्या राजीनाम्याबाबत भुजबळ यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. ‘राजीनामा देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. त्यांच्यावर गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. नारायण राणेंनाही अटक झाली होती, मग त्यांना राजीनामा मागितला गेला होता का? ते दोषी आहेत म्हणून न्यायदेवतेसमोर सिद्ध होत नाही तोवर राजीनाम्याचा प्रश्न नाही. आमच्या दृष्टीने त्यांनी चूक केलेली नाही. दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनाम्याची शिक्षा आम्ही तरी त्यांना देणार नाहीत. अनिल देशमुख, राठोड यांच्याबाबत जे झालं ते आता होणार नाही. राजीनाम्याचा आसूरी आनंद आम्ही भाजपला होऊ देणार नाही, असं भुजबळ म्हणाले.

इतर बातम्या :

Breaking : नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी, ‘हमारा दौर आयेगा…’ मलिकांचा भाजपला सूचक इशारा!

tv9 Explainer: नवाब मलिकांचं ‘D’ कनेक्शन? दाऊदची बहिण ते नवाब मलिकांच्या दोन मुली, ईडीचं जाळं समजून घ्या !

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?