AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांची सावली म्हणून माझी ओळख, पुस्तक लिहिलं तर… प्रफुल्ल पटेल यांचा थेट शरद पवार यांना इशारा

राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. पवारांच्या राजकारणावर पुस्तक लिहून भाष्य करण्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला.

शरद पवार यांची सावली म्हणून माझी ओळख, पुस्तक लिहिलं तर... प्रफुल्ल पटेल यांचा थेट शरद पवार यांना इशारा
praful patel Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2023 | 4:12 PM
Share

मुंबई : अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही चूक होती तर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सत्तेत का बसवले? आता त्यांना विरोधी पक्षनेते पदी का बसवले? असा थेट सवालच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला. एमईटी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला संबोधित करताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच पुस्तक लिहिलं तर मोठा भूकंप होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

मी या मंचावर का? त्या मंचावर का नाही? हा सर्वात मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. याचं उत्तर मी आज देणार नाही. योग्यवेळी उत्तर देईन. मी विस्ताराने सर्व गोष्टी सांगणार आहे. मी खुलासा करणार आहे. भुजबळांनी संकेत दिला आहेच. इशारा काफी है. धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. कधी ना कधी चर्चा करणार, मी सांगणार, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

अजितदादांविरोधात कट

अजित दादाला बदनाम करण्याचा कट सुरू आहे. ते चुकीचं आहे. जे आरोप करत आहेत त्यांनाही माहीत आहे. 2022मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे नक्की झालं होतं. एकनाथ शिंदे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गुवाहाटीला जाणार होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी शरद पवारांना सांगितलं की आम्हाला भाजप सरकारमध्ये जाऊ. नवीन अचानक बॉम्बस्फोट झालेला नाही. दादाने अचानक पिल्लू सोडलं नाही. दादांना सांगितलं शपथविधी घेतली. त्यांनी दादांनी पक्षाविरोधी काम केलं नाही. केलं असतं तर तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते कसं केलं?, असा सवाल पटेल यांनी केला.

हातपाय जोडून विनंती करतो…

मी सौम्य व्यक्ती आहे म्हणून कमी बोलतो. मलाही एक दिवस पुस्तक लिहिणार आहे. ज्या दिवशी मी पुस्तक लिहिलं तर देशाला आणि महाराष्ट्राला बरेच काही समजेल. शरद पवार जिथे तिथे मी होतो. प्रफुल्ल पटेल म्हणजे शरद पवारांची सावली होतो. म्हणून सांगतो, मी या मंचावर आहे. हातपाय जोडून विनंती करतो. आमची भावना समजून घ्या, असं आवाहनही त्यांनी केला.

भाजपसोबत का जाऊ शकत नाही?

आमचे भाजपशी वैचारिक मतभेद नव्हते. महाविकास आघाडी बनली तेव्हा शिवसेना भाजपसोबत होती. आजपर्यंत सर्वात जास्त शिव्या शरद पवार यांना शिवसेना आणि बाळसाहेब ठाकरे यांनी दिल्या. त्या शिवसेनेला आपण मिठी मारू शकतो तर भाजपसोबत का जाऊ शकत नाही? असा सवाल करतानाच आम्ही स्वाभिमानाने युतीत आलो. मेहबूबा मुफ्ती, फारख अब्दुल्ला भाजपसोबत जाऊ शकतात, तर आम्ही का नाही?, असा सवालही त्यांनी केला.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला