बिहारमध्ये नितीश कुमारांचा घात झाला, भाजप मित्रपक्षांना संपवतो हे पुन्हा सिद्ध झाले: रोहित पवार

| Updated on: Nov 11, 2020 | 11:10 AM

भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं. | Rohit Pawar

बिहारमध्ये नितीश कुमारांचा घात झाला, भाजप मित्रपक्षांना संपवतो हे पुन्हा सिद्ध झाले: रोहित पवार
Follow us on

मुंबई: भाजप मित्रपक्षांना संपवतोय याच उत्तम उदाहरण बिहारमध्ये पाहायला मिळाले. संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांचा घात झाला, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले आहे. बिहारच्या निवडणुकीत ‘एनडीए’ला 125 जागांवर विजय मिळाला असला तरी यामध्ये ‘जदयू’च्या अवघ्या 43 आमदारांचा समावेश आहे. जदयू पक्षाच्या स्थापनेपासूनची ही सर्वात खराब कामगिरी आहे. (NCP leader Rohit Pawar on bihar election results 2020)

या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बिहारमधील परिस्थितीविषयी भाष्य केले. भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं. यातून बोध घेऊन नितीश कुमार हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


तर दुसरीकडे रोहित पवार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांचीही प्रशंसा केली आहे. बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत. त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिली, असे रोहित पवार यांनी सांगितले.

नितीश कुमारांना काँग्रेसची ऑफर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) विजय झाल्यानंतर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक नवा फासा टाकला आहे. त्यांनी बिहारचे नियोजित मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजप सोडून आमच्यासोबत चला, अशी ऑफर देऊ केलेय. नितीशजी बिहार तुमच्यासाठी आता लहान पडू लागलाय. तुम्ही राष्ट्रीय राजकारणात आले पाहिजे. ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नीतीला पायबंद घातला पाहिजे. त्यामुळे तुम्ही समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांसोबत आले पाहिजे. यावर जरुर विचार करा, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

Bihar Election: निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो: शिवसेना

बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिटच जप्त; आता कुठे गेला उद्धव ठाकरे आणि राऊतांचा चमत्कार: किरीट सोमय्या

(NCP leader Rohit Pawar on bihar election results 2020)