Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती जयंत पाटलांनी केली आहे (Jayant Patil tested Corona Positive)

Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण
सगळ्या जेव्हा पुराव्याआधारे 'एनआयए'ने निष्कर्ष जाहीर केल्यानंतर राज्य सरकार संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करायला तयार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 9:21 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. (NCP State President Jayant Patil tested Corona Positive)

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद” असे ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

जयंत पाटील यांचे ट्विट

(NCP State President Jayant Patil tested Corona Positive)

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचं आयोजन सध्या राज्यभरात करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत.

राजेंद्र शिंगणेही कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनाही दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री शिंगणे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असं राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह

जयंत पाटलांच्या स्वागताच्या बॅनर्सवरुन नाथाभाऊ गायब; खडसेंच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची गटबाजी

आधी राष्ट्रवादीची ‘परिवार संवाद यात्रा’ आता शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान, उद्धव ठाकरेंच्या बैठकीत ठरलं, मध्यवधीची धास्ती?

(NCP State President Jayant Patil tested Corona Positive)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.