AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी राष्ट्रवादीची ‘परिवार संवाद यात्रा’ आता शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान, उद्धव ठाकरेंच्या बैठकीत ठरलं, मध्यवधीची धास्ती?

गावोगावी शिवसेना पोहोचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात शिवसेनेचं 'शिवसंपर्क' अभियान राबवलं जाणार आहे.

आधी राष्ट्रवादीची 'परिवार संवाद यात्रा' आता शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान, उद्धव ठाकरेंच्या बैठकीत ठरलं, मध्यवधीची धास्ती?
| Updated on: Feb 16, 2021 | 2:31 PM
Share

मुंबई : राज्यात जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ काढल्यानंतर आता शिवसेनेनाही राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान राबवणार आहे. तशी माहिती शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. गावोगावी शिवसेना पोहोचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान राबवलं जाणार आहे. मंगळवारी शिवसेनेची एक महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत शिवसंपर्क अभियानाचा निर्णय घेण्यात आला आहे.(Shiv Sena will implement Shiv Sampark Abhiyan all over the state)

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेची ही बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख उपस्थित होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीनंतरच राज्यभरात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. गावोगावी शिवसेना पोहोचवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं आढळराव-पाटील यांनी सांगितलं.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक

या बैठकीत राज्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी महत्वाची चर्चा झाली. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलंय. आता राज्यातील पाच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी शिवसेनेची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

तीन दिवस मॅरेथॉन बैठका?

दरम्यान, शिवसेनेच्या मोठ्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीतील सर्व आमदारांशीही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. याबाबत पहिली बैठक आज संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे.

मध्यावधीची धास्ती?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यभरात परिवार संवाद यात्रा काढली होती. तर आता शिवसेनेकडूनही शिवसंपर्क अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील दोन घटकपक्ष संपर्क यात्रा काढत असल्यानं सत्ताधाऱ्यांना मध्यावधी निवडणुकांची धास्ती लागली आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची पॉवरफुल बैठक

राष्ट्रवादीच्या ‘संवाद यात्रे’ने आघाडीत उलथापालथ?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

Shiv Sena will implement Shiv Sampark Abhiyan all over the state

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.