शिवसेना गावागावात पोहोचवा, पॉवरफुल बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश

उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत 'वर्षा' बंगल्यावर शिवसेनेची पॉवरफुल बैठक (Shiv Sena powerful meeting) झाली.

शिवसेना गावागावात पोहोचवा, पॉवरफुल बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश
Shiv Sena meeting
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 2:04 PM

नमुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेनेची पॉवरफुल बैठक (Shiv Sena powerful meeting) झाली. या बैठकीला शिवसेनेचे बडे मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच बडी बैठक होती. (Shiv Sena powerful meeting today at Varsha bungalow in presence of CM Uddhav Thackeray )

या बैठकीनंतर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील म्हणाले, “राज्यभर शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात येणार आहे. गावोगावी शिवसेना पोहोचवण्याचे आदेश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहेत”.

या बैठकीत राज्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी महत्वाची चर्चा झाली. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलंय. आता राज्यातील पाच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी शिवसेनेची रणनीती या बैठकीत ठरु शकते.

याच बैठकीत सर्वांचं लक्ष सध्या वादात सापडलेले आणि गेले काही दिवस अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीकडे लागलं होतं. मात्र संजय राठोड या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

तीन दिवस मॅरेथॉन बैठका? 

दरम्यान, शिवसेनेच्या मोठ्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीतील सर्व आमदारांशीही बैठक होणार आहे.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती. याबाबत पहिली बैठक आज संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे.

नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पहिल्यांदाच ही बैठक पार पडत आहे. त्यामुळे या बैठकीकडे विशेष लक्ष लागलं आहे.

संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारणार? 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Maharashtra Minister Sanjay Rathod) यांना आपला राजीनामा ‘मातोश्री’वर पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide case) संजय राठोड यांचं नाव आल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारत राठोडांनी आपला राजीनामा पाठवल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारणार का, भाजपच्या मागणीनुसार राठोडांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई केली जाणार का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडीच्या आमदारांशी बोलणार; तीन दिवस मॅरेथॉन बैठका 

मिशन मुंबई, उद्धव ठाकरेंची सलग दुस-या दिवशी बैठक, शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत खलबतं

संजय राठोड यांचा राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार का?

 (Shiv Sena powerful meeting today at Varsha bungalow in presence of CM Uddhav Thackeray )

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.