भाजपने फक्त ‘या’ तीन लोकांना रोजगार दिला, निलम गोऱ्हेंनी खिल्ली उडवत थेट नावच सांगितली

| Updated on: Oct 03, 2022 | 5:16 PM

जो गोळीबार करतो त्यांना शिस्त पाळा असं सांगणं चुकीचा ठरणार. आमचे सर्व मेळावे आतापर्यंत शिस्तीत झाले आहेत, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.

भाजपने फक्त या तीन लोकांना रोजगार दिला, निलम गोऱ्हेंनी खिल्ली उडवत थेट नावच सांगितली
भाजपने फक्त 'या' तीन लोकांना रोजगार दिला, निलम गोऱ्हेंनी खिल्ली उडवत थेट नावच सांगितली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे: उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची प्रतिमाभंजन करण्याचं षडयंत्रं केले जात आहे. वेदांतावरून आदित्य ठाकरेंवर टीका केली जात आहे. त्याशिवाय मुंबईतील दोन्ही दसरा मेळाव्याची (Dussehra rally) तुलना केली जात आहे. मात्र, आमचा पारंपारिक मेळावा आहे. आमचा मेळावा वाजतगाजत होईल. आमची शक्ती दिसेल. अद्भूत असा मेळावा होणार आहे, असं सांगतानाच भाजपने फक्त तीन लोकांना रोजगार दिला. एक नवनीत राणा, किरीट सोमय्या, आणि नारायण राणे या तिघांनाचा भाजपने रोजगार दिलाय, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादीने शिवसेनेला दसरा मेळाव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपच्या या टीकेचा निलम गोऱ्हे यांनी समाचार घेतला आहे. भाजपला आमच्या दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या संख्येत मिठाचा खडा टाकायचा आहे. राष्ट्रवादीने आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्यात गैर काय? आमची राज्यात ताकद आहे. तुम्हीही बघालच, असं निलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. अंधेरी विधानसभा निवडणुकीत आमचाच उमेदवार निवडून येईल. रमेश लटके यांचे काम चांगलं आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असं सांगतानाच चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

लेडी कंडकटर मंगल गिरी यांना निलंबित करण्याबाबतचा व्हिडीओ मी अजून बघितला नाही. मात्र आपण काम करत असलेल्या ठिकाणी काही सांस्कृतिक आविष्कार करायचे असतील तेव्हा वरिष्ठांची परवानगी लागते. त्यांनी याबाबतची परवानगी घेतली होती की नाही, हे विचारून बघणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

जो गोळीबार करतो त्यांना शिस्त पाळा असं सांगणं चुकीचा ठरणार. आमचे सर्व मेळावे आतापर्यंत शिस्तीत झाले आहेत, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.