AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत भाजपला धक्का, राजीनामा दिलेले 4 नगरसेवक ‘मातोश्री’वर

नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील भाजपचे चार नगरसेवक आज (23 फेब्रुवारी) शिवसेनेत प्रवेश करणार (Navi Mumbai BJP corporaters join shivsena) आहे.

नवी मुंबईत भाजपला धक्का, राजीनामा दिलेले 4 नगरसेवक 'मातोश्री'वर
| Updated on: Feb 23, 2020 | 1:09 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील भाजपचे चार नगरसेवक आज (23 फेब्रुवारी) शिवसेनेत प्रवेश करणार (Navi Mumbai BJP corporaters join shivsena) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या चारही नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांची पत्नी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांसह असंख्य कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील भाजपच्या या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला होता. या चारही नगरसेकांनी आपले राजीनामे महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे.

त्याशिवाय राजीनामा देण्यापूर्वी या नगरसेवकांनी ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदीकुंकू समारंभासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुक केले होते. तुर्भेतील झोडपट्टीला एस.आर.ए. लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असेही आश्वासन शिंदे यांनी दिले (Navi Mumbai BJP corporaters join shivsena) होते.

यावरुन भाजप नेते गणेश नाईक यांचे अस्तित्व खिळखिळे करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु आहेत.

गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत सर्व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, त्यातील काही नगरसेवक पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. त्यामुळे चार नगरसेवक राजीनामा दिल्यानंतर नाईक गटाला ऐन निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

भाजपचे नगरसेवक संदिप सुतार, सलोजा सुतार, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, चंद्रकांत पाटील आणि राजू शिंदे या सहा नगरसेवकांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे गणेश नाईक यांच्यासोबत भाजपवासी झालेल्या नगरसेवकांच्या घरवापसीचा फटका नाईक गटाला बसणार (Navi Mumbai BJP corporaters join shivsena) आहे.

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत भाजपला धक्का, राजीनामा दिलेले 4 नगरसेवक शिवसेनेत जाणार

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश