AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांना देवगिरी, गुलाबराव पाटलांना क 8 बंगला, ‘मातोश्री’वर राहणाऱ्या आदित्य ठाकरेंना कोणता बंगला?

ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. खातेवाटप आज होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र तत्पूर्वी मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं  वाटप (Ministers bungalow) झालं आहे.

अजित पवारांना देवगिरी, गुलाबराव पाटलांना क 8 बंगला, 'मातोश्री'वर राहणाऱ्या आदित्य ठाकरेंना कोणता बंगला?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 02, 2020 | 12:28 PM
Share

मुंबई : ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. खातेवाटप आज होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र तत्पूर्वी मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं  वाटप (Ministers bungalow) झालं आहे. गेल्या महिन्यात चार मंत्र्यांना बंगल्यांच वाटप झाल्यानंतर, आता विस्तारानंतर सर्वांना बंगले (Ministers bungalow) मिळाले आहेत.

सरकारी बंगले वाटपानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला देवगिरी बंगला आला आहे. तर अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगीरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, डॉ. राजेंद्र शिंगणे-सातपुडा आणि राजेश टोपे यांना जेतवन हे बंगले मिळाले आहेत.

ठाकरे सरकारमधील पहिल्या विस्तारात शपथ घेणाऱ्या सर्व 36 जणांना सरकारी बंगल्यांचं वाटप झालं आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा तर छगन भुजबळ यांना रामटेक,  जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत.

सत्ताकेंद्र असलेल्या ‘मातोश्री’वर राहणारे आदित्य ठाकरे यांना अ-6  निवासस्थान मिळालं आहे. बच्चू कडू यांना रॉकिहिल टॉवर 1202, विश्वजीत कदम यांना निलांबरी 302,  सतेज पाटील यांना सुरुची-3, आदिती तटकरे यांना सुनिती -10 हे निवासस्थान मिळालं आहे.

देवेंद्र फडणवीसांना सागर बंगला

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगला मिळाला आहे. गेल्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांना सागर हा बंगला मंजूर झाला. हा बंगला मलबार हिल परिसरातच आहे. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे हे सागर या निवासस्थानी वास्तव्यास होते.

संबंधित बातम्या  

‘नकोसा’ रामटेक भुजबळांच्या वाट्याला, मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप! 

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...