AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माढ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला दुसरा धक्का, कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर

माढा (सोलापूर) : राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या माढा मतदार संघातील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आता पंढरपूरचे काँग्रेस नेते कल्याणराव काळे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला दुसरा मोठा धक्क बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते कल्याणराव काळे हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी असून दोन साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. कल्याणराव काळे यांच्या […]

माढ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला दुसरा धक्का, कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

माढा (सोलापूर) : राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या माढा मतदार संघातील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आता पंढरपूरचे काँग्रेस नेते कल्याणराव काळे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला दुसरा मोठा धक्क बसण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते कल्याणराव काळे हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी असून दोन साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. कल्याणराव काळे यांच्या रूपाने आघाडीला माढा मतदार संघातील हा दुसरा धक्का असणार आहे, कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.

वाचा : भाजपची गुगली, माढ्यात मोहिते पिता-पुत्र नाही, तिसराच उमेदवार जाहीर

माढा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या संजय शिंदे यांना अपक्ष असताना भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष होता आले होते.  मात्र निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून भाजपच्या नेत्यांना मामा बनविले आहे. त्यामुळे संजय शिंदे यांचा राष्ट्रवादीतला प्रवेश आणि राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी भाजपला चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे संजय शिंदे यांना पराभूत करून माढा मतदार संघात कमळ फुलवायचे आहे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीतील नाराज नेत्यांना भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

दुसरीकडे, काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने माढ्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माढ्यात संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा समाना रंगणार आहे. त्यात मोहिते पाटील भाजपमध्ये गेले आहेत. जर कल्याणराव काळेही भाजपच्या गळाला लागले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच आणखी एक खिंडार पडेल, हे निश्चित.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...