AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपची गुगली, माढ्यात मोहिते पिता-पुत्र नाही, तिसराच उमेदवार जाहीर

सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने गुगली टाकली आहे. भाजपकडून माढ्यात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र भाजपने मोहिते पाटील पिता पुत्रांऐवजी तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट जाहीर केलं. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माढ्यात आता भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे […]

भाजपची गुगली, माढ्यात मोहिते पिता-पुत्र नाही, तिसराच उमेदवार जाहीर
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने गुगली टाकली आहे. भाजपकडून माढ्यात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र भाजपने मोहिते पाटील पिता पुत्रांऐवजी तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट जाहीर केलं. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माढ्यात आता भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मोहिते पाटील पिता पुत्रांना तयार राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे विजयसिंह किंवा रणजितसिंह या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट होतं. पण आज अचानक सर्व अंदाज खोटे ठरवत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली.

रणजितसिंह नाईक निंबाळकर हे चार दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. ते काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष होते. मात्र भाजपने त्यांना गळाला लावून थेट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून रिंगणात उतरवलं आहे.

स्थानिक नगरसेवक, रणजित सिंह यांचे मोठे बंधू समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि इतर नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती.

कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याआधी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती झाली होती. माढा लोकसभा मतदारसंघात स्वराज दूध संघ आणि हिंदुराव नाईक निंबाळकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गावागावात त्यांचं नेटवर्क उभं आहे.

फलटण नगरपालिकेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली 9 नगरसेवक, तसेच फलटण पंचायत समितीत 2 सदस्य आणि सातारा जिल्हापरिषदेत 1 सदस्य कार्यरत आहे. यामुळे या पुढील काळात माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे आणि भाजपमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी दोघांची लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं.

राष्ट्रवादीने माढ्याची लढत प्रतिष्ठेची केली आहे. पण अगोदर मोहिते पाटील घराणं आणि यानंतर फलटणमधील निंबाळकर घराणं भाजपाच्या बाजूने असल्यामुळे आणखी चुरस निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीकडून संजय शिंदे रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूरचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना माढ्यातून उमेदवारी दिली आहे. 5 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी माढा आणि उस्मानाबादची उमेदवारी जाहीर केली.

कोण आहेत संजय शिंदे?

संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. भाजपसह इतर सहयोगी पक्षाचा शिंदेंना पाठिंबा आहे.

संजय शिंदे हे मोहिते पाटील कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असून, अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच, संजय शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे बंधू असून, माढा तालुक्यातील निमगाव येथील सरपंच पदापासून आपल्या राजकारणाची सुरवात केली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत.

संबंधित बातम्या

काँग्रेसला आणखी एक धक्का, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा भाजपात प्रवेश  

सुनेत्रा अजित पवार यांचे सहा नातेवाईक लोकसभेच्या रिंगणात 

मोहिते-पाटील तयार राहा, मुख्यमंत्र्यांचे आदेश, माढ्यातून उमेदवारी निश्चित?  

माढ्यात फक्त उमेदवारांची नव्हे, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला   

युती, आघाडी आणि बहुजन वंचित आघाडी, कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी?  

तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं : जानकर  

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.