तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं : जानकर

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाराजी वर्तवली आहे. महादेव जानकरांनी मुख्यमंत्र्यांना उद्याचा अल्टीमेटम दिला आहे. जानकर आता काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसंच बहीण बहीण म्हणून जवळ गेलो, पण बहिणीने जबाबदारी घेतली नाही, असं म्हणत जानकरांनी पंकजावर निशाणा साधला. आज सकाळी पुणे […]

तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं : जानकर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाराजी वर्तवली आहे. महादेव जानकरांनी मुख्यमंत्र्यांना उद्याचा अल्टीमेटम दिला आहे. जानकर आता काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसंच बहीण बहीण म्हणून जवळ गेलो, पण बहिणीने जबाबदारी घेतली नाही, असं म्हणत जानकरांनी पंकजावर निशाणा साधला.

आज सकाळी पुणे येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जानकर म्हणाले, सुजय विखे, रणजित मोहिते पाटील हे सारे महादेव जानकरला भेटायला येतात, त्याअर्थी जानकरला काहीतरी किंमत असेल”. शिवसेना-भाजप युतीने रासपला लोकसभा निवडणुकीत डावलल्याने रासपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. यामुळे आज झालेल्या बैठकीत जानकरांनी मुख्यमंत्र्यांना उद्याचा अल्टीमेटम दिला आहे. जानकर आता काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘माझ्यामुळे सुजय भाजपात’

सुजय विखे पहिल्यांदा माझ्याकडे आले.होते, मी त्यांना भाजपामध्ये जा असं सांगितलं. तिथे तुम्हाला चांगले दिवस येतील असं सांगितलं.आणि तो बिचारा भाजपात गेला असा दावा महादेव जानकरांनी केला.

जानकरांचा युतीला इशारा

तुमच्या चिन्हावर कसं लढणार ? तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं. ज्या पक्षाचं चिन्ह त्या पक्षाचा उमेदवार असतो. याला युती नाही बेकी म्हणतात. त्यामुळे आपण वाढवलेल्या पक्षाच्या चिन्हावर 30-35 जागा लढवणार असल्याचा गर्भित इशारा महादेव जानकरांनी शिवसेना-भाजपा युतीला दिला आहे.

आमची युती भाजपसोबत आहे शिवसेनेसोबत नाही. राज्य सोडलं तर देशभरात 100 ठिकाणी सभा घेणार असल्याचं महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.

“रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन आला. आताही दोनवेळा मुख्यमंत्र्यांचा फोन आला, त्यांना म्हटलं, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या, आजही शिर्डी, परभणीचा उमेदवार तयार आहे. काही मतदार संघ रासपला सोडा आणि तिथे सेना-भाजपसमोर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या”, असं सांगत महादेव जानकर यांनी संध्याकाळपर्यंत थांबा आणि मग निर्णय घेऊया असं कार्यकर्त्यांना सांगितले.

आपल्याला बेदखल करण्यासाठी व्यवस्था उभारली जात आहे. असे नसेल तर काँग्रेस आणि भाजपाकडून त्यांच्याच चिन्हावर निवडणूक लढविण्याचा आग्रह का केला जात आहे, असा सवाल जानकरांनी केला. युद्धात हरलो तरी तहात जिंकावे लागेल. ही वादळापूर्वीची शांतता आहे हा पक्ष कोणाच्या मेहेरबानीवर चालत नाही. आपल्याला संयमाने काम करावे लागेल. पक्ष आणि संघटना वाढीवर भर द्यायला हवा. जातीच्या चौकटीबाहेर पडून पक्ष वाढवा असं आवाहन जानकरांनी कार्यकर्त्यांना केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने महादेव जानकरांना डावलल्याने जानकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सकाळी रासपच्या कार्यकर्ता मेळाव्यात जानकरांनी अनेक मुद्द्यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीला इशारही दिला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना बारामती लोकसभा मतदार संघातून भाजपने तिकीट दिलं होतं. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. अजूनही जानकर माढा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र युतीने डावलल्याने जानकरांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे.

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.