Pankaja Munde | दसरा मेळावा | 'जो दौड कर हरा नहीं सकते, वो तोड कर हराते हैं'; पंकजा मुंडेंचा घणाघात

भगवानबाबांच्या स्मृतिस्थळ परिसरात पंकजा मुंडे ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.

Pankaja Munde | दसरा मेळावा | 'जो दौड कर हरा नहीं सकते, वो तोड कर हराते हैं'; पंकजा मुंडेंचा घणाघात

बीड : विजयादशमीच्या मुहुर्तावर आज सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde Dasara Melava) यांचा दसरा मेळावा पार पडला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं योजण्यात आलं होतं, मात्र तरीही पंकजा मुंडेंच्या अनेक सर्मथकांनी यावेळी गर्दी केली.  भगवानगडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला (Pankaja Munde Dasara Melava).

त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर पूजा अर्चना केली आणि कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या व्यथा मांडल्या. तसेच, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत ही अपूरी अजून मी त्यांच्याकडे आणखी मदतीची मागणी करणार आहे असंही त्या म्हणाल्या. त्याशिवाय, ज्याकडे सपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं, त्या पक्षांतराच्या चर्चांवर त्यांनी पूर्ण विराम लावला. “मी घर बदलणार नाही, आहे तिथेच आहे”, असं त्या म्हणाल्या.

त्याशिवाय, त्यांनी निवडणुकीत झालेल्या पराभवावरही भाष्य केलं. “जिंदगी की रेस में जो आपको दौडकर हरा नहीं सकते, वो आपको तोडकर हरानेकी कोशिश करते हैं”, मी कितीही धावायला तयार आहे पण तुटालया तयार नाही, असं त्या म्हणाल्या.

दसऱ्या मेळाव्यासाठी भगवान गडावर जैय्यत तयारी

दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या 25 फुटी मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली. भगवानबाबांच्या स्मृतिस्थळ परिसरात पंकजा मुंडे ऑनलाइन मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भगवान बाबा स्मृतिस्थळ परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

या दसऱ्या मेळाव्याला पहिल्यांदाच खासदार प्रीतम मुंडे अनुपस्थित राहिल्या. त्यांची प्रकृती खराब असल्याने त्या या मेळाव्याला हजर राहू शकल्या नाहीत. पंकजा मुंडेनी मात्र भाषणावेळी प्रीतम मुंडेंची आठवण काढली.

“मला एवढ्या मोठ्या जमावासमोर बोलताना एक वेगळीच शक्ती अनुभवायला मिळते. ही सीमोल्लंघनाची परंपरा मुंडे साहेबांपासून चालत आलेली आहे. भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संबंध देशात फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतो. गरीब आणि कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी येतो”, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या Exclusive मुलाखतीत त्या बोलत होत्या.

LIVE 

Picture

आपला हा मेळावा एकदा शिवाजी पार्कात घ्यायचा आहे - पंकजा मुंडे

यंदाचा मेळावा झाला ते जाऊ द्या, पुढच्या वर्षी आपण सर्व रेकॉर्ड तोडू, हा मेळावा आपल्याला एकदा शिवाजी पार्क लोळवायचं आहे – पंकजा मुंडे

25/10/2020,2:36PM
Picture

आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं आहे - पंकजा मुंडे

आता मंत्रालयाच्या चकरा मारु नका, त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा, त्याच्यापर्यंत मदत पोहोचवायचं काम करा – पंकजा मुंडे

25/10/2020,2:29PM
Picture

तुम्ही धीर सोडू नका - पंकजा मुंडे

तुम्ही धीर सोडू नका, कुठलाही व्यक्ती पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही, पक्षाचा विचार मोठा असतो, पण गोपीनाथ मुंडेसाहेब हे पक्षापेक्षा मोठे झाले, त्यांचं नाव पक्षातलेच नाही तर विरोधपक्षातले लोकंही घेतात – पंकजा मुंडे

25/10/2020,2:28PM
Picture

मी कुठल्याही कर्जातून मुक्त व्हायला तयार पण तुमचं कर्ज मला हवं - पंकजा मुंडे

मी कुठल्याही कर्जातून मुक्त व्हायला तयार पण तुमचं कर्ज मला हवं आहे. हो मी तुमची कर्जदार आहे, तुम्ही देनदार आहात आणि मी कर्जदार, हे नातं असंच राहू द्या – पंकजा मुंडे

25/10/2020,2:27PM
Picture

राष्ट्रीय सचिव झाले की थोडं हिंदीतही बोलावं लागेल - पंकजा मुंडे

मी राष्ट्रीय सचिव झाले की थोडं हिंदीतही बोलावं लागेल, तेव्हा हिंदीत बोलावं लागेल – पंकजा मुंडे

25/10/2020,2:24PM
Picture

मी कितीही धावायला तयार आहे पण तुटालया तयार नाही - पंकजा मुंडे

“जिंदगी की रेस में जो आपको दौडकर हरा नहीं सकते, वो आपको तोडकर हरानेकी कोशिश करते हैं”, मी कितीही धावायला तयार आहे पण तुटालया तयार नाही – पंकजा मुंडे

25/10/2020,2:23PM
Picture

तुमच्या कोर्टात चेंडू - पंकजा मुंडे

आता तुमच्या कोर्टात चेंडू आहे, तुम्ही किती बैठका लावता ते तुम्ही ठरवा, मला आता शरद पवार साहेबांना विनंती करायची आहे आणि मला विश्वास आहे, की त्यांनीच हा विषय सोडवायचा आहे. आम्ही सुरुवात करुन दिली आहे, आता तुम्ही पुढचं बोला – पंकजा मुंडे

25/10/2020,2:20PM
Picture

सरकारने दिलेली मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी - पंकजा मुंडे

शेतकऱ्यांना दिलेले 10 हजार कोटींच्या पॅकेजचं स्वागत, पण ही मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी – पंकजा मुंडे

25/10/2020,2:16PM
Picture

...तेव्हा माझ्या ऊसतोड कामगारांच्या भाकरी भिजत होत्या - पंकजा मुंडे

ऊसतोड कामगारांचा विषय, जेव्हा कोरोनाची लागण होत होती तेव्हा माझ्या ऊसतोड कामगारांच्या भाकरी भिजत होत्या, ते मला व्हिडीओ कॉल करुन दाखलवत होते

25/10/2020,2:14PM
Picture

जनसंपत्ती कमी होऊ नये - पंकजा मुंडे

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले. ग्रामपंचायतीची सदस्यही नाही. मला तुमची काळजी आहे. जनसंपत्ती कमी होऊ नये – पंकजा मुंडे

25/10/2020,2:09PM
Picture

अतिवृष्टीमुळं शेतकरी बेजार - पंकजा मुंडे

ऑनलाईन मेळावा असताना लोक आले. अतिवृष्टीमुळं शेतकरी बेजार झाला आहे – पंकजा मुंडे

25/10/2020,2:07PM
Picture

हा आगळावेगळा दसरा मेळावा - पंकजा मुंडे

हा आगळावेगळा दसरा मेळावा आहे. हेलिकॉप्टरनं न येता गाडीनं दसरा मेळाव्याला आले. कोरोनामुळं ऑनलाईन मेळावा – पंकजा मुंडे

25/10/2020,2:04PM
Picture

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला सुरुवात

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला सुरुवात, पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांची पूजा आणि आरती केली, थोड्याच वेळात पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाला होणार सुरुवात, भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचं ऊसाची मोळी आणि कोयता देऊन केला सत्कार

25/10/2020,1:59PM
Picture

पंकजा मुंडे भगवान गडावर पोहोचल्या

बीड : पंकजा मुंडे भगवान गडावर पोहोचल्या, तेथे त्या कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन करतील

25/10/2020,1:41PM

Pankaja Munde Dasara Melava

संबंधित बातम्या :

Exclusive : मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार, शिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *