AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबत शरद पवारांची तासभर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली (CM Uddhav Thackeray meet Sharad Pawar)

कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबत शरद पवारांची तासभर चर्चा
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 03, 2020 | 7:37 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुरु असलेल्या कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर आज (3 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली (CM Uddhav Thackeray meet Sharad Pawar). ही बैठक जवळपास 1 तास सुरु होती. या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. ही बैठक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे झाली.

दरम्यान, याआधी महाविकास आघाडीतील नेत्यांच्याही भेटीगाठी झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी शरद पवार यांची भेट घेतली. (CM Uddhav Thackeray meet Sharad Pawar). मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती.

परस्पर लॉकडाऊन वाढवल्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर काल (2 जुलै) संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक झाली. यात लॉकडाऊन, राज्याच्या आर्थिक प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. आधी निर्णय प्रक्रियेबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची तशी भावना झाल्याने, महाविकास आघाडीतील कुरबुरी वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता झालेल्या पवार-ठाकरे भेटीत यावर काही तोडगा निघाला का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आधी काँग्रेसची खदखद

यापूर्वी उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. नुकत्याच झालेल्या भेटीतील मागण्यांवर अद्याप कार्यवाही झाली नसल्याचं काँग्रेसमधील काहींचं मत आहे

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सत्तेत येऊन आता जवळपास सात महिने झाले आहेत. मात्र यादरम्यान महाविकास आघाडीतील कुरबुरीच्या काही घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी सत्तेत सहभागी असलो तरी निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याची भावना उघड बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीनंतर आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याची प्रतिक्रिया दोन्ही काँग्रेस नेत्यांनी दिली होती. (CM Uddhav Thackeray meet Sharad Pawar)

संबंधित बातम्या  

कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी, मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर

उद्धव ठाकरे-अजित पवार यांची बैठक, महाविकास आघाडीतल्या कुरबुरींवर चर्चा?

शिवसेना खासदार अनिल देसाई बाळासाहेब थोरातांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?

संबंधित व्हिडीओ:

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!