उद्धव ठाकरे-अजित पवार यांची बैठक, महाविकास आघाडीतल्या कुरबुरींवर चर्चा?

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर काल संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक झाली

उद्धव ठाकरे-अजित पवार यांची बैठक, महाविकास आघाडीतल्या कुरबुरींवर चर्चा?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. महाविकास आघाडीतल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Uddhav Thackeray meets Ajit Pawar ahead of NCP Disappointment)

परस्पर लॉकडाऊन वाढवल्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर काल संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक झाली. लॉकडाऊन, राज्याच्या आर्थिक प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांची आता प्रत्यक्ष भेट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुरी, आता राष्ट्रवादीची नाराजी

आधी निर्णय प्रक्रियेबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची तशी भावना झाल्याने, महाविकास आघाडीतील कुरबुरी वाढल्याचं चित्र आहे.

आधी काँग्रेसची खदखद

यापूर्वी उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. नुकत्याच झालेल्या भेटीतील मागण्यांवर अद्याप कार्यवाही झाली नसल्याचं काँग्रेसमधील काहींचं मत आहे

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सत्तेत येऊन आता जवळपास सात महिने झाले आहेत. मात्र यादरम्यान महाविकास आघाडीतील कुरबुरीच्या काही घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी सत्तेत सहभागी असलो तरी निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याची भावना उघड बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीनंतर आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याची प्रतिक्रिया दोन्ही काँग्रेस नेत्यांनी दिली होती.

संबंधित बातम्या  

शिवसेना खासदार अनिल देसाई बाळासाहेब थोरातांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?  

(Uddhav Thackeray meets Ajit Pawar ahead of NCP Disappointment)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *