महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुरी, आता राष्ट्रवादीची नाराजी

लॉकडाऊन वाढवताना विश्वासात न घेतल्याची भावना आता राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. Maha vikas aaghadi dissatisfied

महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुरी, आता राष्ट्रवादीची नाराजी
Follow us
| Updated on: Jul 02, 2020 | 4:45 PM

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी पुन्हा एकदा समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवताना विश्वासात न घेतल्याची भावना आता राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधी निर्णय प्रक्रियेत काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची तशी भावना झाल्याने, महाविकास आघाडीतील कुरबुरी वाढल्याचं चित्र आहे. (Maha vikas aaghadi NCP-cong  disappointed)

राज्य सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीवर संवाद झाला. लवकरच पवार-ठाकरे या दोघांची भेट होण्याची शक्यता आहे.

वाचा : खाटेचे कुरकुरणे समजून घ्या, पूर्ण माहिती घेऊन पुन्हा अग्रलेख लिहा, बाळासाहेब थोरातांचे ‘सामना’ला उत्तर 

यापूर्वी उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. नुकत्याच झालेल्या भेटीतील मागण्यांवर अद्याप कार्यवाही झाली नसल्याचं काँग्रेसमधील काहींचं मत आहे.

वाचा :  ‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सत्तेत येऊन आता जवळपास सात महिने झाले आहेत. मात्र यादरम्यान महाविकास आघाडीतील कुरबुरीच्या काही घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी सत्तेत सहभागी असलो तरी निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याची भावना उघड बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीनंतर आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याची प्रतिक्रिया दोन्ही काँग्रेस नेत्यांनी दिली होती.

(Maha vikas aaghadi NCP-cong  disappointed)

संबंधित बातम्या  

शिवसेना खासदार अनिल देसाई बाळासाहेब थोरातांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?  

थोरात-चव्हाण-राऊत यांच्यानंतर विजय वडेट्टीवारांकडूनही नाराजी व्यक्त 

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.