Balasaheb Thorat | तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार : बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. (Balasaheb Thorat Ashok Chavan to meet CM Uddhav Thackeray over Congress Party issues)

Balasaheb Thorat | तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार : बाळासाहेब थोरात
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 1:12 PM

रायगड : तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार आहे, असं सूचक उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही थोरातांनी सांगितलं. सत्तेत सहभागी असूनही काँग्रेसला विचारात घेतले जात नसल्याने पक्षाचे नेते नाराज आहेत. (Balasaheb Thorat Ashok Chavan to meet CM Uddhav Thackeray over Congress Party issues)

“मी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सोमवारी आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ. पक्षांमध्ये मतभेद असतात आणि प्रत्येकाला तसा अधिकारही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व गोष्टी आम्ही सोडवणार आहोत” असं बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी एक्स्क्लुझिव बातचीत करताना सांगितलं.

काँग्रेसला निर्णय प्रकियेत सहभागी करुन घेणे आणि इतर मुद्यावर थोरात आणि चव्हाण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही, निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. बाळासाहेब थोरात यांनी याधीही भावना व्यक्त केल्या होत्या. चार दिवसांपूर्वी मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते.

हेही वाचा : निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेस नाराज, स्वतंत्र बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

आमच्या मागण्या आहेत त्या महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत, आमच्या वैयक्तिक मागण्या नाहीत, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं होतं. (Balasaheb Thorat Ashok Chavan to meet CM Uddhav Thackeray over Congress Party issues)

बाळासाहेब थोरात रायगड दौऱ्यावर

बाळासाहेब थोरात यांनी रायगड दौऱ्याला आज सुरुवात केली. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासह ते मुंबईहून रवाना झाले. निसर्ग चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत.

हेही वाचा : बाळासाहेब थोरांताना विश्वासात घेऊनच काम सुरु, काँग्रेसकडे दुर्लक्ष नाही : राजेश टोपे

अलिबाग तालुक्यात पाहणी केली. नुकसान भरपूर झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे, असं थोरात म्हणाले.

विरोधकांनी अशा कठीण प्रसंगांमध्ये राजकारण करु नये, ही वेळ राजकारण करण्याची नाही, असं आवाहनही बाळासाहेब थोरात यांनी केलं.

(Balasaheb Thorat Ashok Chavan to meet CM Uddhav Thackeray over Congress Party issues)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.