AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेकडून मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप; प्रवीण दरेकर यांची टीका

"गेली 24 वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता असताना शिवसेनेने फक्त सत्तेचा उपभोग घेतला. शिवसेना वर्षोनुवर्षे सत्तेवर असूनही मुंबईचे प्रश्न मात्र कायम आहेत. शिवसेनेनेच मागील अनेक वर्षात मुंबईचे वाटोळे करण्याचे पाप केले," अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

शिवसेनेकडून मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप; प्रवीण दरेकर यांची टीका
| Updated on: Nov 19, 2020 | 12:16 AM
Share

मुंबई : “गेली 24 वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता असताना शिवसेनेने फक्त सत्तेचा उपभोग घेतला. शिवसेना वर्षोनुवर्षे सत्तेवर असूनही मुंबईचे प्रश्न मात्र कायम आहेत. शिवसेनेनेच मागील अनेक वर्षात मुंबईचे वाटोळे करण्याचे पाप केले,” अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. ते दादर येथे मुंबई भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बोलत होते. (Praveen Darekar criticized Shivsena on Mumbai problems)

“गेली 24 वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. साधारण 30 ते 33 हजार कोटींचा पालिकेचा अर्थसंकल्प आहे. गेल्या 24 वर्षांत पालिकेचे हजारो कोटीचे अर्थसंकल्प झाले. पण अजूनही मुंबईत पाणी तुंबण्याचा प्रश्न कायम आहे. शहरात पूर्णपणे नालेसफाई होत नाही. आजही मॅनहोलमधून लोक वाहून जात आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा दीड ते दोन हजार कोटींचा प्रकल्प असूनही ठिकठिकाणी कचरा दिसून येत आहेत. गेली 24 वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता असताना शिवसेनेने फक्त सत्तेचा उपभोग घेतला. वर्षोनुवर्षे सत्तेवर असूनही मुंबईचे प्रश्न मात्र कायम आहेत” असे दरेकर म्हणाले.

दरेकर म्हणाले, “मुंबईत मराठी शाळांची दुरवस्था होत आहे. मुंबईतील ज्या मराठी शाळा बंद पडत आहेत; ते शिवसेनेचे पाप आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा शिवसेनेला विसर पडला आहे. सत्तेसाठी शिवसेना विविध विचारधारेबरोबर गेली. हे मुंबईतील मराठी माणसालाच काय पण कडवट शिवसैनिकांनाही सहन झाले नाही. त्यामुळे मुंबईतील मराठी माणूस आता निवडणुकांची वाट पाहत आहे. जेव्हा फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका येतील, तेव्हा महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी मुंबई भाजपच्या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा तसेच मुंबईचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संंबंधित बातम्या :

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

“उर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात”: देवेंद्र फडणवीस

देशातील लोकांना ‘कर्मयोग’ आवडतो, ‘बोलघेवडेपणा’ नाही; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

(Praveen Darekar criticized Shivsena on Mumbai problems)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.