AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | अजितदादा कॅमेरे बघताच तडक निघाले, गाडीत बसले, शपथविधीवर बोलायचं नाही का?

याआधीही अजित पवार यांनी शपथविधीवरून बोलणं टाळलंय. यावेळी त्यांची ही कृतीदेखील ते उत्तर टाळण्यासाठीच होती का, असा प्रश्न विचारला जात आहे.

Video | अजितदादा कॅमेरे बघताच तडक निघाले, गाडीत बसले, शपथविधीवर बोलायचं नाही का?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 16, 2023 | 4:38 PM
Share

अभिजित पोते, पुणेः राज्याच्या राजकारणात  (Maharashtra Politics) अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनुभवी, परखत मत व्यक्त करणारे नेते म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांची ओळख आहे. त्यामुळे अनेक घडामोडींमध्ये अजित पवार यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते. अशा स्थितीत नेत्यांसमोर अनेक कॅमेरे रोखले जावेत आणि संबंधित नेता ते पाहून तडक निघून जावा, हे जरा विचित्रच. पुण्यात नुकतीच अशी घटना घडली. एका बैठकीनिमित्त अजित पवार पुण्यात होते. बैठक संपल्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देतील, अशी आशा होती. पण अजित पवार आले, त्यांनी कॅमेरे पाहिले अन् इतक्या झटकन् वेगाने पावलं टाकत तिथून निघून गेले.. त्यांनी कुणाशीही बोलायला नकार दिला.

पुण्यात काय घडलं?

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली होती. ही बैठक जवळपास दोन ते अडीच तास चालली. राजकीय वर्तुळात सध्या अनेक वक्तव्य केली जात आहेत. यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे अजित पवारांच्या दिशेने रोखलेले होते.

मात्र बैठक संपल्यानंतर अजितदादा लिफ्टमधून खाली आले. लिफ्टचा दरवाजा उघडला तेव्हा माध्यमांचे कॅमेरे पाहून अजित पवार यांनी चालण्याचा स्पीड एकदम वाढवला. कुणाकडेही न पाहता ते तडक निघाले.

कसबा, चिंचवड पोट निवडणूक तसेच इतर मुद्द्यांवर तुमची प्रतिक्रिया हवी आहे, अशी विनंती माध्यमांच्या प्रतिनिधींनी केली. मात्र अजित दादांनी काहीही प्रतिक्रिया न देता तातडीने ते गाडीत बसून निघून गेले.

शपथविधीवर बोलायचंच नाही का?

२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तो शपथविधी शरद पवार यांच्या सांगण्यावरून होता की नाही, यावरून पुन्हा एकदा तर्क वितर्क लावले जात आहेत. अजित पवार यांची ती कृती बंड होती की त्याला पवारांची संमती होती, हा अनुत्तरीत प्रश्न आहे. अजित पवार यांनी याआधीही शपथविधीवरून बोलणं टाळलंय. यावेळी त्यांची ही कृतीदेखील ते उत्तर टाळण्यासाठीच होती का, असा प्रश्न विचारला जात आहे.

फडणवीस ते रहस्य कधीच उघड करणार नाहीत…

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवेळी नक्की काय चर्चा झाली होती, या चर्चेत काय करार झाले होते, तीनच दिवसात हे सरकार कसं पडलं यासंदर्भात अनेक प्रश्न अडीच वर्षानंतरही अनुत्तरीत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस या प्रश्नांची उत्तरं कधीही बाहेर येऊ देणार नाहीत. ते रहस्य ते कधीच माध्यमांसमोर सांगू शकणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा