AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील न्याय मेलेला नाही म्हणत संजय राऊत यांचा रोख कुणावर? सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर काय म्हणाले राऊत…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशातील न्याय मेलेला नाही म्हणत संजय राऊत यांचा रोख कुणावर? सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर काय म्हणाले राऊत...
Image Credit source: Google
| Updated on: Feb 16, 2023 | 3:50 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी नुकतीच संपली आहे. तब्बल दिन दिवस ही सुनावणी सुरू होती. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच खंडपिठासमोर ही सुनावणी पार पडली आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी न्यायालयापासून निवडणुकीपर्यन्त आणि नारायण राणे यांच्यापासून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी जोरदर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नुकतीच सुनावणी पार पडली आहे. त्या सुनावणीकडे आमचे बारीक लक्ष होते. स्वतः उद्धव ठाकरे यांचे देखील याकडे लक्ष लागून होते. मी सुद्धा बारीक लक्ष ठेवून होती.

त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काही निरीक्षने नोंदविल्याचाही उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून फुटीर गटाचे नेते, नारायण राणे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते वारंवार सांगत आहे की निकाल आमच्याच बाजूने येईल असे म्हणत आहे.

फुटीर गटाचे आमदार म्हणत आहे की पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल, यामध्ये नारायण राणे यांनीही सांगितलं होतं की ब्रेकिंग न्यूज लिहून घ्या निकाल आमच्याच बाजूने लागेल असेही म्हंटले होते त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

त्यावर न्यायालयासमोर तुमच्या काय बैठका झाल्या आहे का ? संजय राऊत यांनी थेट सवाल शिंदे गटासह भाजपला केला आहे. यावरून संजय राऊत म्हणाले देशातील न्याय मेलेला नाही, लोकशाहीचा कोणी मुडदा पाडू शकत नाही.

न्यायालयावर आमचा विश्वास आहे, शिवसेना ही ठाकरे यांची आहे हेच सिद्ध होईल. तारखा आणि सुनावण्याचा घोळ घालायची गरज काय आहे. न्यायालयाने सांगायला हवं की निवडणुका घ्या आमची तयारी आहे असंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

निवडणूक लढायची आमची तयारी आहे, गुवाहाटीला जाऊन आम्हाला नोटिस पाठवायची ही कोणती पद्धत आहे, आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आहोत राजीनामा द्या आम्ही निवडणूक लढू, जनतेवर विश्वास ठेवू असेही राऊत यांनी म्हंटलं आहे.

निर्णय स्पष्ट आणि पारदर्शक यावा अशीच आमची अपेक्षा आहे. कुणीही उठून पक्ष फोडतो आणि सरकार पाडतो यामुळे वातावरण गढूळ झाले आहे, सत्य आमच्या बाजूने आहे आणि सत्यमेव जयते आहे त्याप्रमाणे आमचाच विजय होईल असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.