AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Exit Poll Results : पुण्यात कोण मारणार बाजी? धक्कादायक अंदाज, एक्झिट पोलचा पहिला कल समोर

महापालिका निवडणुकीचं मतदान संपलं आहे, आता त्यानंतर एक्झिट पोल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. जनमतच्या एक्झिट पोलने पुणे महापालिका निवडणुकीबाबत धक्कादायक अंदाज वर्तवला आहे.

Pune Exit Poll Results : पुण्यात कोण मारणार बाजी? धक्कादायक अंदाज, एक्झिट पोलचा पहिला कल समोर
Pune Exit Poll Results Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 15, 2026 | 7:13 PM
Share

महापालिका निवडणुकीचं मतदान संपलं आहे, आता त्यानंतर एक्झिट पोल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. जनमतच्या एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, पुण्यात भाजपला 93 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर शिवसेनेला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला एकूण सात जागा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा पुणे महापालिकेत भाजपला मोठं यश मिळण्याचा अंदाज आहे, गेल्यावेळी पुणे महापालिकेत भाजपला 97  जागा मिळाल्या होत्या, भाजपला पुणे महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळालं होतं, यावेळी देखील एक्जिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पुण्यातील आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी ठरणार आहे. यावेळी पुण्यात भाजपला 93  च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला सात जागा मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, जनमतच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला 43 तरे राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार मनसेला तर पुण्यात खातं देखील उघडता आलेलं नाहीये, तर अपक्ष दोन ते तीन ठिकाणी विजयी होण्याचा अंदाज आहे.

गेल्यावेळी पुणे महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. तब्बल 97 जागा भाजपला मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी दोन नंबरला होतं, पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला गेल्यावेळी 39 जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी राजकीय समीकरण बदलली होती, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली मात्र पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या,  दोन्ही राष्ट्रवादी विरोधात भाजप असा हा थेट सामना आहे. दरम्यान ऐक्झिट पोलच्या अंदाजानुसार  पुण्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येताना दिसत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...