Vidyanand Bapat: मी काही लोकांशी आधीपासूनच संपर्क साधलाय आता गणेशोत्सवानंतर…विद्यानंद बापट राजकारणात एन्ट्री घेणार? स्पष्टच म्हणाले…
Vidyanand Bapat On Politics Entry: मागील काही दिवसांपासून विद्यानंद बापट राजकारणात जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरु होती, आता यावर बापटांनीच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या आवाजाविरोधात आक्रमक भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे विद्यानंद बापट सध्या शांत असल्यामुळे ते आता पुढे काही आक्रमक भूमिका घेणार नाही असं म्हटले जात होते. पण आता उत्सव संपल्यानंतर आता ते ध्वनिप्रदूषणविरोधी कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे पाईल उचलणार आहे. याविरुद्ध कठोर अंमलबजावणी करण्यासाठी ते मैदानात उतरणार आहेत.
विद्यानंद बापट यांनी एका माध्यमाशी बोलताना आपल्या पुढील लढ्याची संपूर्ण रणनीती बोलून दाखवली. ते म्हणाले की, ‘खुल्या वातावरणात केवळ रात्री १० नंतरच नाही, तर दिवसाही ध्वनिक्षेपकांवर पूर्णपणे बंदी घालण्याय यावी. यासाठी सध्याच्या ध्वनिप्रदूषणविरोधी कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे. यासाठी लोकसभा किंवा राज्यसभेत नवीन विधेयक मांडले जावे, म्हणून मी अतोनात प्रयत्न करणार. यासंदर्भात देशातील काही प्रमुख लोकप्रतिनिधीशी आधीच मी संपर्क केला आहे.”
यंदाच्या गणेशोत्सवातील आवाजाच्या पातळीवर बोलताना त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर आणि मंडळांवर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. “एवढे होऊनही पुण्यातील गणेशोत्सवात यंदा डीजेचा आवाज अजिबात कमी झालेला नाही. मंडळांनी नियम पाळून डिजे बंद करावेत, यासाठी मी स्वतः रात्री १२ नंतर ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क केला होता, तर तक्रारीही नोंदवल्या होत्या, दुर्दैवाने, विसर्जनाच्या दिवशीही आवाज कमी होण्याची कोणतीही चिन्हे मला दिसली नाहीत, अशी खंत विद्यानंद बापट यांनी व्यक्त केली.
ॲड. असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर भाष्य केल्यानंतर, विद्यानंद बापट पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगली आहे. यावर पूर्णविराम देत बापट म्हणाले “प्रत्येकाचे मार्ग हे वेग वेगळे असतात. राजकारणात गेल्यानंतर विचारांना अनेक प्रकारच्या मर्यादा लागतात. त्यामुळे सध्या तरी माझा राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही”. विद्यानंद बापट हे गणेशोत्सावातील डिजेबंदी या प्रकरणावर भाष्य केल्यानंतर अधिक चर्चेत आले होते. पुण्यात गणेशोत्सावात डिजेबंदी करावी अशी त्यांची मागणी होती, आणि यानंतर हे प्रकरण अधिकच गाजले.
Follow Us
