राहुल गांधी अमेठीशिवाय या मतदारसंघातूनही निवडणूक लढणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीशिवाय आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केरळमधील वायनाड मतदारसंघातून ते लढणार असल्याच्या वृत्ताला काँग्रेस आमदार दीपक सिंह यांनी दुजोरा दिलाय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा बडोदा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. राहुल गांधी हे संपूर्ण देशाचे नेते […]

राहुल गांधी अमेठीशिवाय या मतदारसंघातूनही निवडणूक लढणार
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीशिवाय आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केरळमधील वायनाड मतदारसंघातून ते लढणार असल्याच्या वृत्ताला काँग्रेस आमदार दीपक सिंह यांनी दुजोरा दिलाय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा बडोदा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

राहुल गांधी हे संपूर्ण देशाचे नेते आहेत. वायनाडमधूनही ते निवडणूक लढतील आणि अमेठीप्रमाणेच लाखोंच्या फरकाने जिंकून येतील. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधीही दोन-दोन जागी निवडणूक लढले होते. या पारंपरिक बाबी आहेत, असं दीपक सिंह म्हणाले. शिवाय राहुल गांधी दोन ठिकाणी निवडणूक लढण्याबाबत विचार करत असल्याचं काँग्रेस प्रवक्त रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय.

वायनाड मतदारसंघ केरळमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. एआयसीसी महासचिव ओमन चांडी यांच्या मते, राहुल गांधींनी दक्षिण भारतातूनही निवडणूक लढावी यासाठी मागणी केली जात आहे. त्यामुळेच राहुल गांधींकडे वायनाडमधून लढण्यासाठी आग्रह केला आहे.

काँग्रेस केरळच्या 20 पैकी 16 जागांवर निवडणूक लढत आहे, ज्यापैकी 14 उमेदवार जाहीर केले आहेत. पण वायनाड आणि वडाकरा मतदारसंघाचा उमेदवार अजून जाहीर केलेला नाही. अगोदर राहुल गांधी नांदेडमधून लढणार असल्याचीही चर्चा होती. पण आता वायनाडमधून ते लढणार असल्याचं समोर येतंय.