AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही पक्षातील आमदारांना जास्त निधी, काहींना कमी, पण त्या पक्षाचं नाव घेणार नाही : थोरात

आमच्यासह मित्र पक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat on unhappy congress MLA)

काही पक्षातील आमदारांना जास्त निधी, काहींना कमी, पण त्या पक्षाचं नाव घेणार नाही : थोरात
| Updated on: Aug 25, 2020 | 1:45 PM
Share

मुंबई : काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह 11 आमदार नगरविकास खात्याच्या निधी वाटपावरुन नाराज आहेत. यासंदर्भात “आमदारांशी बोलून त्यांचं आम्ही समाधान करु,” अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. “आमच्यासह मित्रपक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat on unhappy congress MLA)

“काही आमदारांमध्ये नाराजी आहे. ती आम्ही बोलून घालवू. काही पक्षातील आमदारांना जास्त निधी मिळाला आहे. तर काहींना कमी मिळाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र मी त्या पक्षाचं नाव घेणार नाही,” असेही बाळासाहेब थोरातांनी सांगितले.

“राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिले, ही अपेक्षा आहे. काही घटना घडल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यात सुधारणा करु, असे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासंदर्भात आमदारांशी बोलून त्यांचं आम्ही समाधान करु. आम्ही सर्व नेते मुख्यमंत्र्यांशी बोललो, असे थोरात म्हणाले.

“आमदारांना मतदारसंघ सांभाळायचा आहे म्हणून ते लढत आहेत. आमच्या पक्षातील नाराजी आणि आघाडी सरकारचा काही संबंध नाही. मतदार संघाच्या प्रश्‍नांसाठी आमदार नाराज आहेत. आमच्यासह मित्र पक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असेही बाळासाहेब थोरातांनी सांगितले.

हेही वाचा –  काँग्रेसच्या नाराज आमदाराची अजित पवारांकडून समजूत, गोरंट्याल म्हणतात “दादा, तुमच्यावर पूर्ण भरोसा”

जालन्यात विकास निधीच्या वाटपावरुन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल नाराज झाले होते. आधीच महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या चर्चा रंगल्या असताना गोरंट्याल यांनीही उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरंट्याल यांची समजूत काढली.

अजित पवारांचा काल दुपारी 3.40 वाजता फोन आला होता. तुमची नाराजी मी दूर करणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर “दादा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे, असे मी म्हणालो. उपोषणही मी मागे घेतले. बाकीच्या आमदारांचीही नाराजी नाही. अजितदादांनी स्वतः गॅरंटी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज भेट नाही, मात्र अधिवेशनात मुख्यमंत्री भेटतील” असेही गोरंट्याल यांनी सांगितले.  (Balasaheb Thorat on unhappy congress MLA)

संबंधित बातम्या : 

काँग्रेसचे तब्बल 11 आमदार उपोषणाच्या तयारीत, ठाकरे सरकारवर जाहीर नाराजी

‘निधी वाटपावरुन काँग्रेसचे 11 नाराज आमदार उपोषणाच्या तयारीत’, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...