पुणेः खासदार राहुल शेवाळेंविरोधात (Rahul Shewale) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) आक्रमक झाल्या आहेत. शेवाळेंविरोधातले पुरावे घेऊन त्या आज नागपूरात जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेणारआहेत. ज्या महिलेने राहुल शेवाळेंविरोधात तक्रार केली आहे, तिच्या जीवाला धोका असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे.
दरम्यान, ठोंबरे यांनी सदर महिलेसोबत फेसबुक लाइव्ह केल्याने तसेच तिची ओळख उघड केल्यामुळे ठोंबरेंविरोधात कारवाई करण्याचा इशारा महिला आयोगाने दिला आहे. मात्र, मी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नसल्याचा दावा रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने शोषणाचे आरोप केले आहेत.
सोमवारी राहुल शेवाळे यांनी एक पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले.
आपल्याविरोधातील आरोपांमागे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात अस्लयाचा आरोप शेवाळे यांनी केला आहे.
यावर रुपाली पाटील-ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलं.
सदर महिलेचे दाऊद आणि डी गँगशी संबंध असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे.
तर शेवाळेंकडे या दाव्यासाठीचे पुरावे असतील ते सादर करावे, असं आवाहन केलंय.
या महिलेचे दाऊदशी संबंध असते तर तुम्ही तिच्याशी संबंध कसे ठेवले, असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी केलाय.
राहुल शेवाळेंविरोधातील पुरावे घेऊन आज रुपाली पाटील ठोंबरे नागपुरात धडकणार आहेत.
मात्र सदर महिलेची ओळख उघड केल्याने महिला आयोगाने ठोंबरे यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
माझ्याविरुद्ध तक्रार खोट्या तक्रारी दिल्या आहेत, मिंधे लोक माझ्याविरुद्ध तक्रारी करत आहेत. माझ्या लाईव्हबद्दल ही तरुणी आक्षेप घेऊ शकते. विधी विभागाचा त्यांना सल्ला घ्यावा, असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे.