AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मतदारांनी भाजपला जागा दाखवली, कुठलीही पालिका निवडणूक लढवा, पराभव निश्चित”

विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला त्यांची जागा दाखवली आहे, असे सचिन सावंत म्हणाले. (Sachin sawant bjp election)

मतदारांनी भाजपला जागा दाखवली, कुठलीही पालिका निवडणूक लढवा, पराभव निश्चित
सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते
| Updated on: Dec 09, 2020 | 7:16 PM
Share

मुंबई :  “महाविकास आघाडीला राज्यातील जनतेने स्वीकारलं आहे. मतदारांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवली आहे,” असे चिमटे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपला काढले. तसेच, “भाजपने कुठल्याही पालिका निवडणुकीची तयारी करावी; महाविकास आघाडी त्यांचा पराभव निश्चित करेल, असा दावाही त्यांनी केला. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.  (Sachin sawant criticizes bjp on maratha reservation and election)

यावेळी बोलताना, सावंत यांनी भाजपवर सडकून टीका केली. “भाजपने कुठल्याही पालिका निवडणुकीसाठी तयारी करावी. महाविकास आघाडी त्यांचा पराभव निश्चित करेल. मतदारांनी विधानपेरिषदेच्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवली आहे,” असे सावंत म्हणाले. तसेच, राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

सीबीआय, ईडीचा परिणाम होणार नाही

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर ईडीने धाड टाकलेली आहे. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याच आरोप आहे. या पार्श्वभूमीवर “केंद्रीय संस्थांचा वापर करुन ऑपरेशन लोटस राबवण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जातोय. त्यासाठी ईडी, सीबीआयचाही वापर केला जात आहे. पण या सर्वांचा आमच्या आमदारांवर कुठलाही परिणाम होणार नाही,” असे म्हणत महाविकास आघाडी मजबूत असल्याचा दावा सचिन सवंत यांनी केला.

मराठा आरक्षणावरुन फडणवीसांची दुटप्पी भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्याची मागणी राज्य सरकारने केलेली आहे. त्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्जही केलेला आहे. सरकारच्या याच मागणीवर बुधवारी (9 डिसेंबर) 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी करण्यात आली. यावर बोलताना, “राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पूर्ण तयारी केली होती. सरकारने कोर्टात योग्य भूमिका मांडलेली आहे. त्यानंतर पुढील सुनावणी 25 जानेवारी 2020 रोजी होईल. मात्र, मराठा आरक्षणाला घेऊन भाजप सरकारवर टीका करत आहे. त्यांच्या या टीकेचे मला आश्चर्य वाटत आहे,” असे सावंत म्हणाले. तसेच, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात असल्याचं सांगून विरोधकांवर टीका करायचे. मात्र, ते आता सरकावर टीका करताना दिसत आहेत. त्यांच्या भूमिकेची आठवण करुन देणे गरजेचं आहे,” असं म्हणत त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांनाही घेरलं.

संबंधित बातम्या :

कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता एक चांगला निर्णय येईल; अमोल मिटकरी आशावादी

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी; जाणून घ्या, संपूर्ण घटनाक्रम

मराठा आरक्षणाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घुसखोरी, सदावर्तेंचा युक्तिवाद

(Sachin sawant criticizes bjp on maratha reservation and election)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.