AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती का?”

रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकरी आंदोलनावरुन शरद पवार आणि आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानावर टीका केली आहे. Sadabhau Khot Sharad Pawar

शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती का?
सदाभाऊ खोत. शरद पवार
| Updated on: Feb 08, 2021 | 5:16 PM
Share

सातारा: रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकरी आंदोलनावरुन शरद पवार आणि आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधी क्रिकेट खेळले होते का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला दुसऱ्या क्षेत्राबद्दल बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावर सदाभाऊ खोत बोलत होते. ( Sadabhau Khot asked question Sharad Pawar when played Cricket)

सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी “ज्यांना ज्या क्षेत्रातल कळत त्यातल त्यांनी बोलाव अस विधान केलं हे ऐकून थोडा वेळ हसू आलं,असं रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले. शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

दुसऱ्यांना कमी लेखण्याची पद्धत चुकीची

अनेक विषय असतात अनेकांना वाटत मला सोडून दुसऱ्याला कळत नाही अशी कमी लेखण्याची पध्दत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

रिहानाला भारतातील शेतकऱ्यांचा कळवळा

पॉपस्टार रिहानानं कायतरी ट्विट केलं, तिला भारतातील शेतकऱ्यांचा कळवळा आला. ती ज्या खंडात राहते तिथ काही लोक अर्ध पोटी राहतात त्याबद्दलही कधी ट्विट करायला पाहिजे होते, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

शरद पवार सचिनच्या ट्विटवर काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, “सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे.”

संबंधित बातम्या:

मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची मंदिरे नसून कत्तलखाने, सदाभाऊ खोतांचा आरोप

इतिहास लिहिला जाईल, तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे, सदाभाऊंचा पवारांवर हल्लाबोल

( Sadabhau Khot asked question Sharad Pawar when played Cricket)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.