AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची मंदिरे नसून कत्तलखाने, सदाभाऊ खोतांचा आरोप

रयत क्रांती संघटेनेचे नेते सदाभाऊ खोतांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना समर्थानाची भूमिका घेत विरोधकांवर टीका केली आहे. Sadabhau Khot

मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची मंदिरे नसून कत्तलखाने, सदाभाऊ खोतांचा आरोप
| Updated on: Dec 13, 2020 | 12:26 PM
Share

कोल्हापूर: रयत क्रांती संघटेनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सुरुवातीपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना समर्थानाची भूमिका घेतली आहे. शेतकर्‍यांच्या शेतीमाल खरेदी विक्रीसाठी मार्केट कमिट्या स्थापन झाल्या. मात्र, मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची मंदिरे नसून कत्तलखाने झाल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. शेतकर्‍यांची अडते, मार्केट कमिटीच्या जोखडातून मुक्तता व्हावी, त्यांना स्वातंत्र्य मिळावे यासाठीच केंद्र सरकारने कृषी कायदे मंजूर केले आहेत, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला. (Sadabhau Khot criticize opponent Agriculture Acts)

रयत क्रांतीतर्फे कायद्यांना अभिषेक राजकीय स्वार्थापोटी काही पक्षांकडून शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यातूनच या कायद्यांना लागलेली दृष्ट, वाईट भावना दूर व्हाव्यात, अशी आमची भावना आहे. यासाठी सोमवार 14 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यभरात रयत क्रांती संघटनेच्यावतीने कृषी कायद्यांना अभिषेक घालण्यात येणार आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

केंद्र सरकारनं मंजूर केलेले कायदे शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती आणणारे आहेत. हे कायदे शेतकर्‍यांच्या हिताचे असून गेली सत्तर वर्ष भांडवलशाही व्यवस्थेत खितपत पडलेल्या शेतकर्‍यांच्या बाजूचे आहेत. या विधेयकामुळे शेतकर्‍यांना हमीभाव मिळण्याबरोबरच शेतीमाल साठवणूकीच्या बंधनातून मुक्तता होणार असल्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. (Sadabhau Khot criticize opponent Agriculture Acts)

मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची मंदिरे नसून कत्तलखाने

गेल्या सत्तर वर्षात शेतकर्‍यांना न्याय मिळाला नाही. शेतकर्‍यांच्या शेतीमाल खरेदी विक्रीसाठी मार्केट कमिट्या स्थापन झाल्या. पण, त्यांनी भांडवली व्यवस्थेमध्ये शेतकर्‍यांची केवळ लूटच केली. या कमिटीमध्ये शेतकर्‍यांना मताचा अधिकार का दिला जात नाही, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला. या मार्केट कमिट्या म्हणजे शेतकर्‍यांची मंदिरे नसून कत्तलखाने असल्याचा आरोपही त्यांनी केला. जुलमी व्यवस्थेतून शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी हे कायदे आणलेत असेही ते म्हणाले. (Sadabhau Khot criticize opponent Agriculture Acts)

फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून वेअर हाऊस, कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येणार आहे. शेतीवर केवळ शेतकर्‍याचीच मालकी राहणार आहे. शेतातील उत्पादनाबाबत शेतकरी व व्यापारी यांच्यात करार होणार आहे. खरेदीसाठी मोठ्य प्रमाणात व्यापारी येणार असल्याने स्पर्धा वाढून शेतीमालाला चांगला भाव मिळणार आहे. त्यातून उत्पादनाची वाहतूक, दलाली, हमाली यासह अन्य खर्चाची बचत होणार आहे. एकूणच हे कायदे शेतकर्‍यांना मिळालेले खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याचे प्रतिक आहे.

काँग्रेसने यापूर्वी मुक्त बाजारपेठेची घोषणा केली होती. आपल्या जाहीरनाम्यात या विधेयकाची बाजू घेतली. तर आत्ता विरोध का? त्यातूनच काँग्रेसचा खरा मुखवटा जनतेसमोर आला आहे. काँग्रेसच्या धोरणामुळेच देशात आजपर्यंत पाच लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कॉन्ट्रक्ट शेतीला सुरुवात केली. पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात शेती बंधनमुक्त झाली तरच प्रगती होईल असेही नमुद केले आहे. त्यामुळे लोक असली खोटी आत्मचरित्रे वाचणे बंद करतील, अशी टीका त्यांनी केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार उपस्थित होते. (Sadabhau Khot criticize opponent Agriculture Acts)

संबंधित बातम्या:

‘शेतकऱ्यांच्या पोरांवर ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्यासमोर यांनी लोटांगण घातलं’, सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर पलटवार

Sadabhau Khot | ‘मी कोव्हिड पॉझिटिव्ह, लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन’, सदाभाऊ खोत यांना कोरोना संसर्ग

(Sadabhau Khot criticize opponent Agriculture Acts)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...