AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही, ते मुद्दाम अडकतायत का? : संदीप देशपांडे

शिवसेना लोकांच्या त्रासावरील लक्ष हटवण्यासाठी मुद्दाम कंगनाच्या प्रसिद्धीच्या जाळ्यात अडकत आहे का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय (Sandeep Deshpande on Politics over Kangana Ranaut).

प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही, ते मुद्दाम अडकतायत का? : संदीप देशपांडे
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 05, 2020 | 11:10 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करण्याचा आरोप केलाय. कुणीतरी प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही. तरीही शिवसेना लोकांच्या त्रासावरील लक्ष हटवण्यासाठी मुद्दाम कंगनाच्या प्रसिद्धीच्या जाळ्यात अडकत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय (Sandeep Deshpande on Politics over Kangana Ranaut).

संदीप देशपांडे म्हणाले, “भाविकांच्या मंदिरात प्रवेशाला बंदी, लाखो लोक बेरोजगार आहेत, आरोग्य व्यवस्था चांगली नसल्याने हजारो लोकांचे बळी जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून काम करत असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. रेल्वेसेवा चालू नसल्यामुळे लोकांचे प्रवासाचे भयंकर हाल होत आहेत. या सर्व परिस्थितीवरुन लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न होत आहेत का? यावर विचार करायला हवा.”

“ज्या व्यक्तीची 5 पैशांची किंमत नाही अशी व्यक्ती काही वादग्रस्त वक्तव्य करत प्रसिद्धीसाठी जाळं फेकत आहे. यात जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही. तरीही शिवसेना मुद्दाम जाळ्यात अडकते आहे का? यामागे इतर सर्व विषयांवरील लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे का? लोकांना होणाऱ्या त्रासावरुन लक्ष हटवून या विषयावर लक्ष केंद्रीत करण्याचं हे षडयंत्र तर नाही ना याचा विचार माध्यमांनी आणि जनतेने करायला हवा,” असं संदीप देशपांडे म्हणाले.

“मागील 2 महिन्यात एक हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिनीचा संपादक याच शिवसेनेचे वाभाडे काढत असताना आख्खी शिवसेना गप्प होती. मग आत्ताच या सगळ्याचा उद्रेक का होतोय याचा नक्की विचार करायला हवा. या षडयंत्रामध्ये कोणकोण आहे याचाही विचार करायला हवा. आपण सर्वजण सुज्ञ आहात याचा विचार नक्की करा”, असंही संदीप देशपांडे यांनी नमूद केलं.

दरम्यान, याआधी “दररोज सोशल मीडियावर टुकार पोस्ट टाकून खळबळ माजवायची ही अभिनेत्री कंगना रनौतची एक विकृतीच आहे. या विकृतीमागे कुणाचं डोकं आहे हेही आम्हाला नीट माहिती आहे. एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं, असा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न आहे”, अशी टीका मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे. कंगनाला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही, अशीदेखील भूमिका अमेय खोपकर यांनी ट्विटरवर मांडली आहे.

“कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत करायला मनसैनिक खूप उत्सूक आहेत, असं कुणाला वाटत असेलही, पण कुणाला किती महत्त्व द्यायचं, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला शिकवलेलं आहे”, असं अमेय खोपकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

आम्ही धमकी नव्हे, अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, राऊतांचा रनौतवर हल्ला

फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत

“उचलली जीभ…” मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं

Sandeep Deshpande on Politics over Kangana Ranaut

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...