फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत

कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा घोर अपमान केला, असा घणाघात सचिन सावंत यांनी केला.

फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत

मुंबई : विवेक मोईत्रा यांच्यापासून भाजप आमदार राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अभिनेत्री कंगना रनौत आणि राम कदम यांचे बोलवते धनी हे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस असल्याचा घणाघातही सचिन सावंत यांनी केला. (Sachin Sawant takes a dig at Devendra Fadnavis and Kangana Ranaut demands Narco Test of Ram Kadam)

“विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजप कार्यालयात 53 वेळा फोन करुन संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील” असे सचिन सावंत यांनी ट्विटरवर लिहिले आहे.

“KanganaTeam म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील 106 हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व ‘आमची मुंबई’वर प्रेम करणाऱ्या सर्वांचा घोर अपमान केला आहे” असा दावा सचिन सावंत यांनी केला.

“महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलवते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे” असेही सचिन सावंत म्हणाले.

“या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. पण या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते, मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का?” असा प्रतिप्रश्न राम कदम यांनी सचिन सावंत यांना ट्विटरवर विचारला.

(Sachin Sawant takes a dig at Devendra Fadnavis and Kangana Ranaut demands Narco Test of Ram Kadam)

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती आहे, भाजप अँगल तपासून घ्यावा. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज नेक्ससमध्ये सीबीआय संदीप सिंह यांची चौकशी करणार आहे. संदीप सिंह हे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे निर्माते आहेत, ज्या सिनेमाचे पोस्टर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी यांनी लाँच केले होते.” असे ट्वीट सचिन सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.

“विधानपरिषदेवर पाठवत नसल्याने सचिन सावंत फार निराशेतून बोलतात” असा बोचरा वार फडणवीसांनी केला होता.

संबंधित बातम्या :

सुशांत प्रकरणातील आरोपी संदीप सिंहने कोणत्या भाजप नेत्याला 53 कॉल केले? : सचिन सावंत

विधानपरिषदेवर पाठवत नसल्याने सचिन सावंत फार निराशेतून बोलतात : देवेंद्र फडणवीस 

“संदीप सिंह मोदींच्या बायोपिकचे निर्माते, फडणवीसांसह मंचावर” सचिन सावंत यांचे भाजपकडे बोट 

(Sachin Sawant takes a dig at Devendra Fadnavis and Kangana Ranaut demands Narco Test of Ram Kadam)

Published On - 11:59 am, Fri, 4 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI