AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तराह आपको प्यारे होते, संदीप देशपांडेंची शायरी

'वक्त करता जो वफा आप हमारे होते, हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तरह आपको प्यारे होते' असं मनसेच्या संदीप देशपांडेंनी ट्विटरवर लिहिलं आहे.

हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तराह आपको प्यारे होते, संदीप देशपांडेंची शायरी
संदीप देशपांडे आणि उद्धव ठाकरे
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Nov 21, 2019 | 9:50 AM
Share

मुंबई : शिवसेनेला एकनिष्ठेवरुन टोला मारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शायरी ट्वीट केली आहे. ‘वक्त करता जो वफा आप हमारे होते, हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तरह आपको प्यारे होते’ असं देशपांडेंनी ट्विटरवर लिहिलं आहे. कोणे एके काळी शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची टाळी नाकारल्यावरुन त्यांनी अप्रत्यक्ष चिमटे काढल्याचं दिसत (Sandeep Deshpande Tweet on Shivsena) आहे.

‘वक्त करता जो वफा आप हमारे होते, हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तराह आपको प्यारे होते, पर थोडीसी आपके फितरत मैं वफा भी कम है, वरना जिती हुई बाजी तो ना हारे होते……’ अशी शायरी संदीप देशपांडे यांनी लिहिली आहे.

गुण न जुळवता फक्त सत्तेच्या आकर्षणावर लग्नाची घाई, संदीप देशपांडेंचा महासेनाआघाडीला टोला

‘एक वेळ असती, की तुम्ही आमचे असता, आम्हीही काँग्रेस राष्ट्रवादीप्रमाणे तुम्हाला प्रिय असतो, पण तुमच्या स्वभावातच निष्ठा कमी होती, नाहीतर तुम्ही जिंकलेली बाजी गमावली नसती.’ अशा आशयाची ही शायरी आहे.

शिवसेनेने भाजपला अलविदा करत अनेक वर्षांची युती तोडली. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्यानंतर शिवसेनेने हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास सोडला. आता भिन्न विचारधारेच्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत महाराष्ट्रात महासेनाआघाडीचं सरकार स्थापन होण्याची चिन्हं आहेत. यावरुन देशपांडेंनी कानपिचक्या लगावल्या आहेत.

याआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं निवासस्थान 10 जनपथवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या चाललेल्या मॅरेथॉन बैठकांवरुनही संदीप देशपांडेंनी टोमणे मारले. अग्निपथ चित्रपटातील डायलॉगवरुन ‘ले शपथ ले शपथ ले शपथ 6/10 जनपथ जनपथ जनपथ अग्निपथ अग्निपथ अग्निपथ’ असं ट्वीट (Sandeep Deshpande Tweet on Shivsena) त्यांनी केलं होतं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...