गुण न जुळवता फक्त सत्तेच्या आकर्षणावर लग्नाची घाई, संदीप देशपांडेंचा महासेनाआघाडीला टोला

संदीप देशपांडेंनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या एकत्रित सत्तास्थापनेवर ही टीका केली (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) आहे.

गुण न जुळवता फक्त सत्तेच्या आकर्षणावर लग्नाची घाई, संदीप देशपांडेंचा महासेनाआघाडीला टोला
Follow us
| Updated on: Nov 20, 2019 | 5:21 PM

मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप कायम आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 3 आठवडे उलटले (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) आहेत. तरीही अद्याप सत्तास्थापन झालेली नाही. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टीका केली (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) आहे. लग्न जुळवताना पत्रिकेत सर्व गुण जुळतात की नाही हे पाहत नाहीत आणि लग्न जुळवत आहेत, त्यांच्यासाठी शुभमंगल ‘सावधान’. अशी टीकासंदीप देशपांडेंनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या एकत्रित सत्तास्थापनेवर केली (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) आहे.

“आपण जेव्हा लग्न करतो. तेव्हा सुद्धा पत्रिका बघतो. त्यावेळी 36 गुण जुळतात का? किंवा त्यापूर्वी आपले विचार जुळतात का? हे बघतो. मात्र आता इथे असे काहीही राहिलेले नाही. फक्त सत्तेच्या आकर्षणावर लग्न करायची घाई सुरु आहे. त्यामुळे जे लग्नात सर्व ठिकाणी ‘शुभमंगल सावधान’ म्हणतात, तेच आजही म्हणावसं वाटत आहे.” असे संदीप देशपांडे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक जुन्या भाषणातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावर संदीप देशपांडे यांना विचारले असता, ते म्हणाले राज ठाकरे हे महाराष्ट्राचे दूरचा विचार करणारे नेते आहेत. त्यांनी कुठल्याही परिस्थितीचे वर्णन हे त्यांनी अगोदरच केलं आहे. मग ते पुलावामा हल्ला असेल किंवा महाराष्ट्राची आजची जी राजकीय परिस्थिती आहे. त्या पद्धतीने एका विचारधारेवर जे लोक एकत्र राहिले ते विचारधारा विसरुन एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी तो व्हिडीओ तंतोतंत लागू होत आहे. म्हणून मीसुद्धा तो सोशल मीडियावर शेअर (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) केला आहे.

या व्हिडीओमध्ये राज ठाकरे म्हणतात की, “ज्या लोकांनी भाजप -शिवसेना एकत्र निवडणुका लढल्या, ते निवडणूक झाल्यानंतर आज शिवसेना राष्ट्रवादीसोबत चालली आहे. भाजप विरोधी पक्षात आहे. हा काय पत्त्यांचा क्लब आहे का की माझे पत्ते पिसून झाले आता तू पत्ते पीस…”या वाक्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.

दरम्यान राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना गेले काही दिवस राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच राज ठाकरे यांनी या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे सध्याची परिस्थिती घडत असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा या जुना व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. यापूर्वी राज ठाकरे यांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यातच हा नवा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) आहे.

संबंधित बातम्या : 

पवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या तसं

आधी पवारांसोबत चर्चा, मग मोदींनी तात्काळ अमित शाहांना बोलावलं!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.