पवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या तसं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Sharad Pawar meet PM Narendra Modi) यांची भेट घेतली.

पवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या तसं
Follow us
| Updated on: Nov 20, 2019 | 2:12 PM

नवी दिल्ली :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Sharad Pawar meet PM Narendra Modi) यांची भेट घेतली. शरद पवारांनी राज्यातील ओल्या दुष्काळाची माहिती आणि अपेक्षित मदत याबाबत पंतप्रधान मोदींशी (Sharad Pawar meet PM Narendra Modi)  चर्चा केली. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात 45 मिनिटे बैठक झाली. यावेळी पवारांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीची माहिती देत केंद्र सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना यासंदर्भात सविस्तर पत्र दिलं. त्यात नाशिक आणि नागपूरमधील नुकसानीची सविस्तर माहिती दिली आहे.

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे केंद्राने तात्काळ मदत द्यावी, अशी आग्रही मागणी शरद पवार यांनी केली आहे. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधानांना पुण्यातील कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं. पुण्यात 30 तारखेला वसंतदादा पाटील शुगर इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे. 22 देशातील लोक इथे येतील. याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी यावं, यासाठी पवारांनी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं आहे.

शरद पवार यांचं पत्र जसंच्या तसं 

आदरणीय पंतप्रधान,

यावर्षी अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील 325 तालुक्यांमधील जवळपास 54.22 लाख हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. या अभुतपूर्व परिस्थितीची आढावा घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मी 1 नोव्हेंबरला नाशिक जिल्ह्यात आणि 14 नोव्हेंबरला नागपूर विभागात भेटी दिल्या.

माझ्या या भेटींमध्ये मी जे अनुभवलं ते अत्यंत वेदनादायक आणि धोक्याची घंटा वाजवणारं आहे. यावर्षी परतीच्या मान्सून पावसाने महाराष्ट्रातील मोठ्या भागात शेतातील जवळपास प्रत्येक पीक उद्ध्वस्त केलं. मी भेट दिलेल्या नाशिक आणि नागपूरमधील इशारा देणाऱ्या परिस्थितीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो.

नाशिक जिल्हा

1. नाशिकमध्ये सोयाबीन, धान, बाजरी, मका, टोमॅटो, कांदा आणि इतरही फळभाज्यांचं पीक अगदी काढणीच्या स्थितीत होतं. अवकाळी पावसाने ही सर्व पिकं अक्षरशः मातीमोल झाली आहेत.

2. नाशिक भागात द्राक्ष हे महत्त्वाचं पीक आहे. त्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. बागलान तालुक्यात द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. यामुळे बाजारात लवकर द्राक्षं येतात आणि त्याचा चांगला परिणाम निर्यातीवरही होतो.

3. नाशिकमध्ये एकूण 8 आदिवासी तालुक्यांचा समावेश आहे. तेथे धान (भात) हेच प्रमुख पीक असून उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी गावात एका आदिवासी महिलेने अवकाळी पावसामुळे धानाचं पीक उद्ध्वस्त केल्यानंतर आलेल्या संकटाबद्दल आपली वेदना मांडली.

4. मागील 10 महिन्यात नाशिकमध्ये या कोलमडून टाकणाऱ्या परिस्थितीमुळे एकूण 44 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

5. जिल्हा प्रशासनाने प्राथमिक स्तरावर जी माहिती दिली त्यावरुन नाशिकमध्ये 3.50 लाख हेक्टर शेतीचे नुकसान केले आहे. या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरुच आहेत. पंचनाम्यांचा वेग वाढवायला हवा.

6. येवला आणि इतर तालुक्यांमध्ये मोठा काळ पाऊस पडत राहिल्याने तयार झालेल्या आद्रतापूर्ण वातावरणात शेळी आणि मेंढ्यांमध्ये आजारांचं प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर जिल्हा (विदर्भ)

1. नागपूर हे संत्र्याची राजधानी आहे. मात्र, यावर्षी मान्सूनसह परतीच्या पावसाने संत्र्याच्या पिकावर मोठा दुष्परिणाम झाला. त्यामुळे संत्र्याच्या उत्पादनात जवळपास 50-60 टक्के घट होणार आहे.

2. अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यातील 35 हजार हेक्टर कपाशीच्या पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. या पावसाने कापूस बोंडांच्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम केला आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.

3. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे कपाशी, सोयाबीन, भात, तूर, ज्वारी ही पिकं असलेल्या 45 हजार हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं आहे. यामुळे 88 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला.

या अभूतपूर्व नुकसानीच्या स्थितीत मी शेतकऱ्यांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खालील मागण्या करतो,

1. शेतकरी अडचणीत असताना विमा कंपन्या अत्यंत असंवेदनशीलपणे वागल्या आहेत. तांत्रिक गोष्टी समोर करुन विम्याचे दावे नाकारण्यावरच या कंपन्यांचा सर्वाधिक भर राहिला आहे. त्यामुळे या विमा कंपन्यांसोबत तात्काळ एक बैठक घेण्याची गरज आहे.

2. नाशिकमधील शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षांपासून शेती कर्जाचे वितरणच झाले नसल्याची तक्रार केली आहे. कर्ज देऊ शकणाऱ्या सहकारी संस्था नोटबंदी केल्यानंतर कोलमडल्या आहेत. सावकार आणि खासगी वित्तसंस्थांनी जबरदस्तीने कर्जवसुली केल्याचे प्रकार घडत आहेत. अर्थ मंत्रालयाने तात्काळ कर्जपुरवठ्याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात. पुन्हा पिकांचं उत्पादन घेण्यासाठी शुन्य व्याजदराने शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज पुरवठा करावा.

3) केंद्राने तात्काळ मदत द्यावी

महाराष्ट्र सरकारने ओल्या दुष्काळासाठी खरीप पिकाला हेक्टरी 8 हजार तर फळबागांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 18 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. मात्र नुकसानीशी तुलना केल्यास ही रक्कम अत्यंत तोकडी आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी 10 हजार कोटींच्या विशेष मदतीची घोषणा केली. मात्र, त्याची अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.

मी जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री होतो, तेव्हा 2012-13 मध्ये दुष्काळग्रस्तांना हेक्टरी 30 हजार रुपयांची मदत दिली होती. आताही शेतकऱ्यांना त्याप्रमाणेच मदतीची गरज आहे.

4) शेतकऱ्यांची सरसकट आणि बिनशर्त कर्जमाफी

शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचं सध्याचं नुकसान पाहता, त्यांचं चालू कर्जही सरसकट माफ करावं.

दोन जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती, संपूर्ण आकडेवारी माझ्याकडे आहे. मात्र पाऊस लांबल्यामुळे उर्वरीत महाराष्ट्रात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाडा आणि विदर्भाचाही त्यात समावेश आहे. मी त्याबाबतही माहिती जमा करत असून, ती माहितीही तुम्हाला लवकरच देईन.

सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने, तुम्ही तात्काळ लक्ष घालून आवश्यक मदत करावी. हतबल शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात देऊन, त्यादृष्टीने शक्य ती सर्व पावलं उचलावीत, ही विनंती.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.