अभिषेक – आराध्या यांचं नाव घेत ऐश्वर्या राय हिचा खुलासा, सांगितली कुटुंबातील मोठी गोष्ट
Aishwarya Rai Bachchan Family : घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना ऐश्वर्या राय बच्चन हिने अभिषेक आणि आराध्या यांच्याबद्दल वक्तव्य, अभिनेत्रीने सांगितली कुटुंबातील मोठी गोष्ट... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा...

Aishwarya Rai Bachchan Family : अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या सिनेमांत दिसत नसली तरी, कार्यक्रमांमध्ये हजेरी लावते आणि चर्चेचा विषय बनते… नुकताच ऐश्वर्या हिने रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती… जेथे ऐश्वर्या हिच्या लूकती सर्वत्र चर्चा रंगली. अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील समोल मीडियावर व्हायरल झाले. एवढंच नाही तर, मुलाखीत ऐश्वर्या हिने असं वक्तव्य केलं, ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
ऐश्वर्या राय म्हणाली की कमी सिनेमे केल्याने आणि तिच्या कुटुंबाला प्राधान्य दिल्याने तिला असुरक्षित वाटत नाही. ऐश्वर्या राय बच्चन मातृत्व आणि करिअरबद्दल म्हणाली, ‘आराध्या हिची काळजी घेण्यात आणि अभिषेक याच्यासोबत राहिल्यामुळे मला एक गोष्ट जाणवली आहे आणि ती म्हणजे, जर मी कोणता सिनेमा साईन जरी नाही केला, तरी मला असुक्षित वाटत नाही… असुरक्षितता ही माझ्यासाठी कधीच प्रेरक शक्ती नव्हती. ‘
पुढे ऐश्वर्या म्हणाली, ‘मला कधीच असुरक्षित आणि अस्वस्थ वाटत नाही.. कायम मी कोण आहे, याची मला जाणीव आहे… आणि ती जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे.. असं देखील अभिनेत्री म्हणाली. या गोष्टीचा मला कधी त्रास देखील झाला नाही… मी जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा मला कोणी लॉन्च केलं नव्हतं. मी फक्त काम करत पदार्पण केलं…’ असं देखील ऐश्वर्या राय म्हणाली.
ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहे. एवढंच नाही तर, एक काळ असा होता, जेव्हा फक्त चाहतेच नाही तर, अभिनेते आणि दिग्दर्शक देखील ऐश्वर्याच्या सौंदर्यावर भाळले होते. तिच्यासोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक, निर्मात्यांची रांग लागलेली असायची…
बॉलिवूडमध्ये करियर करत असताना ऐश्वर्या आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची ओळख झाली आणि त्यानंतर ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. आराध्या देखील बॉलिवूडत्या लोकप्रिय सेलिब्रिटी किड्स पैकी एक आहे.
