राहुल वैद्य वैतागला, थेट गेले 4.2 लाख, डोक्याला हात लावत गायकाने..
राहुल वैद्य याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. राहुल याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बॉलिवूडला अनेक हीट गाणे दिली आहेत. मात्र, नुकताच राहुल वैद्य याला मोठा फटका बसला असून त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली.

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी अर्थात इंडिगोचे तीनतेरा वाजले आहेत. सलग पाचव्या दिवशीही इंडोगोची सेवा विस्कळीत बघायला मिळाली. प्रवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. फक्त हेच नाही तर इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेनंतर इतर विमान कंपन्यांनी तिकिटांमध्ये मोठी वाढ केली. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई येथील विमानतळांवर प्रवाशांना रात्रभर त्रास सहन करावा लागतोय. थेट तिकिटांमध्ये मोठी वाढ झाल्याने खिशाला झळही बसतंय. या प्रकारामुळे अनेकांना इच्छित स्थळी जाणेही शक्य होत नाहीये. याचा फटका फक्त सामान्य प्रवाशांनाच नाही तर सेलिब्रेटिंनाही बसताना दिसत आहे. देशातंर्गत विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आता याचा फटका गायक राहुल वैद्य यालाही बसला आहे.
नुकताच राहुल वैद्य याला गोव्याहून कोलकाता येथे शोनिमित्त जायचे होते. मात्र, त्याच्या प्रवासाचा हा सर्वात वाईट दिवस असल्याचे त्याने म्हटले. आम्ही तिथे कसे पोहोचणार हे माहिती नाही, असे त्याने म्हटले. दुसरा एक फोटो त्याने इंस्टास्टोरीवर ठेवला. त्यामध्ये त्याच्या हातात डोमेस्टिक एअरलाईनची काही तिकिटे आहेत. मात्र, आपल्याला या तिकिटांसाठी किती पैसे मोजावी लागली हे त्याने सांगितले आहे.
डोमेस्टिक एअरलाईन तिकिटांसाठी आपल्याला तब्बल 4.2 लाख रुपये खर्च करावे लागले, असल्याचे राहुलने सांगितले. सगळे बोर्डिंग पास हातात घेऊन त्याने आपला फोटो शेअर केला. त्याच्या हातामध्ये एअर इंडियाच्या विमानाची तिकिटे दिसत आहेत. त्याला गोव्याहून कोलकता येथे जाण्यासाठी तब्बल 4.2 लाख रूपये मोजावी लागली. यावरून एक अंदाज येऊ शकतो की, विमानाच्या तिकिटात किती जास्त वाढ झाली. एका फोटोमध्ये राहुल वैद्यने थेट डोक्याला हात लावला.

फक्त राहुल वैद्य हाच नाही तर अनेक सेलिब्रिटिंना इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा फटका बसला आहे. दिल्लीहून जाणाऱ्या जवळपास विमानांची तिकिटे दुप्पटपेक्षा अधिक करण्यात आली आहेत. विमानतळावर फक्त इंडिगोची विमाने साईटला लावलेल दिसत आहेत. सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला असून लवकरच सर्व गोष्टी सुरळीत होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, असे असले तरीही प्रवाशांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
