AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांचं जंगी स्वागत! भातखळकर म्हणतात, ओंगळवाणं प्रदर्शन, तर मुनगंटीवार म्हणतात, ‘गजा मारणेचंही स्वागत झालं होतं’

संजय राऊत दिल्लीवरुन मुंबईत दाखल झाले. त्यावेळी मुंबई विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विमानतळावर शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टीका केलीय.

संजय राऊतांचं जंगी स्वागत! भातखळकर म्हणतात, ओंगळवाणं प्रदर्शन, तर मुनगंटीवार म्हणतात, 'गजा मारणेचंही स्वागत झालं होतं'
संजय राऊत यांचं मुंबई विमानतळावर शिवसैनिकांकडून स्वागतImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Apr 07, 2022 | 5:39 PM
Share

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. ईडीने संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त केलीय. या कारवाईनंतर संजय राऊत अधिक आक्रमक बनले आहेत. अशावेळी राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सोमय्या यांनी INS विक्रांतसाठी जमा केलेला 58 कोटी रुपयांचा निधी हडपल्याचा आरोप केलाय. त्यानंतर आज संजय राऊत दिल्लीवरुन मुंबईत दाखल झाले. त्यावेळी मुंबई विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विमानतळावर शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी ढोल ताशा वाजवत राऊतांचं स्वागत केलंय. दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टीका केलीय.

संजय राऊत घाबरले आहेत- भातखळकर

अर्वाच्य भाषेत शिव्या देता. कोण आहेत संजय राऊत, बेशरमपणा आणि नंगानाच याचा कळस झालाय. संजय राऊतांनी हे धंदे बंद करावेत. राऊतांची एवढी प्रॉपर्टी जप्त केली, त्याचं उत्तर त्यांनी जनतेला द्याव. त्यांनी अजून नाटकं केली तर अजून प्रकरणं बाहेर येतील, त्यांच्या या ओंगळवाणेपणाला कुणीही घाबरणार नाही. ओंगळवाणं प्रदर्शन आहे, राऊतांनी जे आरोप केले, अन्न घोटाळा, त्याचं काय झालं पुढे? संजय राऊत हे घाबरलेले आहेत. त्यांचं मानसिक आरोग्य बिघाडलेलं आहे. आता तर ते म्हणतात, न्यायालयही आमच्या बाजूने नाही. संजय राऊत हे भ्रमिष्ठ झालेले आहेत. ते अर्वाच्य भाषा वापरात. त्यांनी भगवे झेंडे तिथं आणले, हा महाराजांचा अपमान आहे. त्यांना एवढंच करायचं असेल तर त्यांनी हिरवे झेंडे नाचवावे, त्यांनी भगवे झेंडे आणले, त्याविरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही करतो, अशा शब्दात भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

भातखळकर पुढे म्हणाले की, भुजबळ काल बोलले, पीएमएलए कायदा रद्द करुन टाका. उद्या उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले, तर हा कायदाच रद्द करुन टाकतील, हा देशच विकून टाकतील. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप होताहेत, त्यांना सामोरे जा. जो मनुष्य नगरपालिकेतही निवडून आला नाही तो काय सांगणार. संजय राऊत आमच्या बाबत NC आहेत. मातोश्री म्हणजे कोण? मातोश्री 1 की मातोश्री 2 हे त्यांनी सांगावं, जागा, प्लॉट कसे विकत घेतले याचा खुलासा करावा, ते खोटं बोलले, त्यांचं राहतं घर जप्त केलं, असा घणाघात भातखळकर यांनी केलाय.

सुधीर मुनगंटीवारांकडून गजा मारणेची आठवण!

पुण्यात गजानन मारणे नावाचा गुंड होता, तो सुटल्यानंतर त्याचं जंगी स्वागत झालं, म्हणजे तो काही आदर्श पुरुष आहे का? प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला सांगायाचं तू गजानन मारणेच हो, हे सांगण्यासारखं आहे? अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्या स्वागतावर खोचक शब्दात टीका केलीय.

इतर बातम्या : 

‘किरीट सोमय्या मला घाबरतो, समोर आला तर मी त्याला मारेन’, शिवसेना नेत्याची जीभ घसरली; शक्ती कपूरचीही दिली उपमा

Sanjay Raut : संजय राऊत मुंबईत दाखल, शिवसेनेकडून राऊतांचं जंगी स्वागत, सोमय्यांविरोधात आक्रमक

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा