AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : संजय राऊत मुंबईत दाखल, शिवसेनेकडून राऊतांचं जंगी स्वागत, सोमय्यांविरोधात आक्रमक

शिवसेना खासदार संजय राऊत आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागताला हजारो शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. ईडीने कारवाई केल्यानंतर राऊत पहिल्यांदाच मुंबईत येत असल्याने सेनेकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय.

Sanjay Raut : संजय राऊत मुंबईत दाखल, शिवसेनेकडून राऊतांचं जंगी स्वागत, सोमय्यांविरोधात आक्रमक
संजय राऊतांचं विमानतळावर जंगी स्वागतImage Credit source: tv9
| Updated on: Apr 07, 2022 | 5:01 PM
Share

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागताला हजारो शिवसैनिक (Shivsena) मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. ईडीने कारवाई केल्यानंतर राऊत पहिल्यांदाच मुंबईत येत असल्याने सेनेकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. तर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. संजय राऊतांच्या फोटोसह पोस्टरबाजी करताना शिवसैनिक दिसून आले. विमानतळ ते भांडुप रॅली काढून शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहे. दोन दिवसांपूर्वीच संजय राऊतांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर जोरदार वातावरण तापलं होतं. त्यानंतर शिवसेनेकडून हे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. बुधवारीच शरद पवारांनी भेट मोदींची भेट घेत संजय राऊतांवरील ईडीने केलेल्या कारवाईची तक्रार केली होती.

शिवसेनेकडून जंगी स्वागत

बुधवारीच संजय राऊत अनेक आरोप करत किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा मीडियासमोर शिवीगाळ करताना दिसून आले होते. त्यानंतर आज शिवसैनिकांकडून ही स्वागताची तयारी करण्यात आली होती. संजय राऊत विमानतळावर पोहोचण्याच्या आगोदरच मोठ्या संख्येने शिवसैनिक विमानतळावर दाखल झाले होते. संजय राऊत विमानतळावर दाखल होताच संजय राऊतांवर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांच्या हातात योद्धे असे फलक संजय राऊत यांच्या फोटोसह दिसून आले. त्यानंतर शिवसेनेची ही रॅली निघाली. शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनावर भाजप नेत्यांनी मात्र सडकून टीका केली आहे.

भाजप नेत्यांची स्वागतावर सडकून टीका

शिवसेना खासदार संजय राऊत याचं स्वागत करणे हे चुकीचे आहे. गुंड गजा मारणे जेलमधून सुटल्यानंतर त्याची मिरवणूक निघाली होती. मग त्याला स्वागत म्हणायचं का? त्यामुळे सर्वसामान्य माणसाला हे पटणारं नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. तर संजय राऊत हे घाबरलेले आहेत. त्यांचं मानसिक आरोग्य बिघडलं आहे. त्यांना उपचाराची गरज आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे. गलिच्छ भाषा वापरणारे संजय राऊत त्यांचं असे स्वागत होणे म्हणजे हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. राऊतांच्या स्वागताला भगवे झेंडे लावले त्याविरोधात त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली आहे. संजय राऊतांनी देशद्रोह्यांची भूमिका उचलून धरली तरी त्यांना पाठिंबा मिळतोय. त्यामुळे उद्या जर उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान झाले तर  भ्रष्टाचारविरोधी कायदाच रद्द करून टाकतील, अशीही प्रतिक्रिया भातखळकरांनी दिली आहे.

Sonia Gandhi meets PM Modi: सोनिया गांधी मोदींना भेटल्या, नमस्कारही केला, पण मोदींची नजर खाली; पाहा फोटो काय सांगतो?

‘किरीट सोमय्या मला घाबरतो, समोर आला तर मी त्याला मारेन’, शिवसेना नेत्याची जीभ घसरली; शक्ती कपूरचीही दिली उपमा

Vasant More Mns : मला फक्त मोदींचाच फोन यायचा बाकी, सेंटीमेंटल वसंत मोरेंना कुणाकुणाची खुली ऑफर?

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.