AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची नाटकं बंद, आयसीसीने बाहेरचा रस्ता दाखवत या संघाला घेतलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यावरून बांगलादेशच्या नाटकाचा शेवट झाला आहे. आयसीसीने 22 जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकार काही केल्या ऐकत नव्हतं. अखेर स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

T20 World Cup: बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची नाटकं बंद, आयसीसीने बाहेरचा रस्ता दाखवत या संघाला घेतलं
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची नाटकं बंद, आयसीसीने बाहेरचा रस्ता दाखवत या संघाला घेतलंImage Credit source: PTI
| Updated on: Jan 22, 2026 | 5:05 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. दोन्ही देशांनी या स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली आणि वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं. पण असं असताना क गटात असलेल्या बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने नाटकी सुरू केली. भारतात क्रिकेट खेळण्यास बांगलादेशने नकार दिला. भारतात खेळणं असुरक्षित असल्याचं कारण पुढे केलं. इतकंच काय तर बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करावे असा आग्रह धरला. आयसीसीने या संदर्भात बांगलादेशसोबत वारंवार चर्चा केली. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काही केल्या तयार होत नव्हतं. अखेर आयसीसीने 16 सदस्यांचा यावर कौल घेतला. यात बांगलादेशच्या बाजूने फक्त दोन मतं पडली. या दोन मतात बांग्लादेश आणि पाकिस्तान हे दोन संघच होते. बाकीचे 14 मतं भारताच्या पारड्यात पडली. त्यामुळे आयसीसीने 14-2 ने भारताच्या बाजूने कौल दिला. तर श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही बांगलादेशचे सामने आमच्या देशात सुरक्षेच्या दृष्टीने कठीण असल्याचं सांगितलं. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आपल्याच जाळ्यात अडकलं आणि व्हायचं तेच झालं. बांगलादेशने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने गुरूवारी ढाक्यात एका बैठकीचं आयोजन केलं. यात बांगलादेशने स्पष्ट केलं की काही केलं तर भारतात टी20 वर्ल्डकप खेळणार नाही. बीसीबी अध्यक्षांनी सांगितलं की, ‘आयसीसीने आमचे सामने भारतातून हलवले नाहीत. आम्हाला जागतिक क्रिकेटबद्दल माहिती नाही आणि त्याची लोकप्रियता कमी होत आहे. आयसीसीने 20 कोटी लोकांना निराश केले आहे. क्रिकेट आता ऑलिंपिकमध्ये जात आहे, परंतु जर आपल्यासारखा देश तिथे जात नसेल तर ते आयसीसीचे अपयश आहे.’

आयसीसीने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतून बांगलादेशला काढलं आहे. त्या ऐवजी स्कॉटलँड संघाला स्पर्धेत संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बांगलादेशला ही स्पर्धा घरीच बसून पाहावी लागणार आहे. बांग्लादेश असलेल्या गटात आता स्कॉटलँड खेळणार आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील क गटात हा बदल केला गेला आहे. आता बांगलादेशची जागा स्कॉटलँड घेईल. या गटात इंग्लंड, इटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिज हे संघ आहे. स्कॉटलँडचे सुरूवातीचे तीन सामने कोलकात्यात होतील. तर शेवटचा साखळी फेरीचा सामना मुंबईत होणार आहे.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग